Breaking News
कमालच झाली! इंडिया अंडर 19 संघात 9व्या क्रमांकाच्या फलंदाजाने ठोकलं वादळी शतक
India U-19 vs England U-19 Team: भारतीय क्रिकेट संघाला इंग्लंडच्या मुख्य संघाविरुद्ध 5 विकेटने पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे टीम इंडियाची खिल्ली उडवली जात आहे. दुसरीकडे भारताच्या अंडर-19 संघाने आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. भारताच्या अंडर-19 संघाने इंग्लंड लायन्स संघाला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत केले आहे. विशेष म्हणजे या सामन्यात खालच्या फळीतील फलंदाजांनी विशेषतः योगदान दिले आहे. या सामन्यात 9व्या क्रमांकावर खेळणाऱ्या फलंदाजाने कमालच केली.
भारतीय संघाचा नवव्या क्रमांकाचा फलंदाज हरवंश (हर्वांश पंगालिया) याने चमत्कार केला, त्याने 52 चेंडूत 9 षटकार आणि 8 चौकारांच्या मदतीने शतक (103) केले. यासह भारताच्या संघाने 442 धावांपर्यंत मजल मारली.
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर भारताच्या 19 वर्षांखालील संघाने प्रथम फलंदाजी करत 442 धावा केल्या आणि प्रत्युत्तरात इंग्लंडच्या 19 वर्षांखालील संघाचा डाव फक्त 211 धावांवर संपला. अशाप्रकारे भारताला मोठा विजय मिळाला आहे.
आयपीएलमध्ये चमकणारा वैभव सूर्यवंशी या सामन्यात काही खास कामगिरी करू शकला नाही. संघाकडून सलामीला आलेला वैभव केवळ 17 धावा करून बाद झाला.
भारताच्या 19 वर्षांखालील संघाचा कर्णधार आयुष महात्रे देखील अपयशी ठरला आणि तो फक्त एक धाव काढल्यानंतर बाद झाला.
भारतीय संघात आणखी एक खास गोष्ट दिसून आली. खरंतर 19 वर्षांखालील संघातून इंग्लंडविरुद्ध एकूण 9 गोलंदाजांनी गोलंदाजी केली आणि ही योजना यशस्वी ठरली.
भारतीय संघाचा नवव्या क्रमांकाचा फलंदाज हरवंश पंगालिया (Harvansh Pangalia) याने चमत्कार केला, त्याने 52 चेंडूत 9 षटकार आणि 8 चौकारांच्या मदतीने शतक (103) केले. त्याच्या या खेळीच्या जोरावर भारताने या सामन्यात विजय मिळवला.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade