पहलगाम पुन्हा पर्यटकांनी गजबजले मुख्यमंत्री ओमर अब्दुलांची पोस्ट
पहलगाम पुन्हा पर्यटकांनी गजबजले मुख्यमंत्री ओमर अब्दुलांची पोस्ट
श्रीनगर – पहलगामजवळील बैसरन खोर्यात २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील पर्यटनावर मोठा परिणाम झाला होता. मात्र आता परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. सरकारने बंद करण्यात आलेल्या ४८ पैकी १६ पर्यटनस्थळे पुन्हा खुली केली आहेत, त्यात पहलगामदेखील समाविष्ट आहे. याबाबत जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पहलगाम शहर पर्यटकांच्या वर्दळीने पुन्हा गजबजून गेले असल्याची एक्स पोस्ट केली आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर तब्बल ८० टक्के हॉटेल बुकिंग रद्द करण्यात आली होती, तर सुरक्षेच्या कारणास्तव ४८ पर्यटनस्थळे तात्पुरती बंद करण्यात आली होती. आता पर्यटकांची पावले पुन्हा काश्मीरकडे वळत आहेत. महिन्याभरातील आपल्या दुसऱ्या पहलगाम दौऱ्यावर असलेल्या ओमर अब्दुल्ला यांनी गजबजलेले रस्ते आणि वाहतूक कोंडीची छायाचित्रे शेअर केली आहेत.
त्यांनी म्हटले की, मी काही दिवसांपूर्वी पहलगामला आलो होता. तेव्हा तेथील बाजारपेठ जवळजवळ ओस पडली होती. मी तिथून सायकल चालवत गेलो होतो. आज परत आलो असता पहलगाम पर्यटकांनी गजबजलेले दिसले. देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले पर्यटक, येथील आल्हाददायक हवामान आणि पावसाळी वातावरणाचा आनंद लुटत होते. मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी वाटते.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
ADHARSH SWARAJ 21 AUG TO...
- 27 August, 2025
ADHARSH SWARAJ 14 AUG TO...
- 20 August, 2025
ADHARSH SWARAJ 7 AUG TO...
- 13 August, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar