Breaking News
26/11 च्या घटनेवर येतोय चित्रपट, उज्ज्वल निकमांच्या भूमिकेत हा अभिनेता
मुंबई - मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यावर एक नवीन चित्रपट येत आहे. अभिनेता राजकुमार राव यात मुख्य भूमिका साकारणार आहे. अभिनेता राजकुमार राव या चित्रपटात उज्ज्वल निकम यांची भूमिका साकारत आहे. निकम हे देशातील सर्वात प्रसिद्ध सरकारी वकील राहिले आहेत. त्यांनी अनेक हाय-प्रोफाइल खटले लढले आहेत. २६/११ च्या खटल्यातील त्यांची भूमिका सर्वात महत्त्वाची मानली जाते. मात्र हा चित्रपट उज्ज्वल निकमचा संपूर्ण बायोपिक नसेल. हा चित्रपट फक्त त्या खटल्यावर केंद्रित असेल ज्यामध्ये निकम यांनी दहशतवादी अजमल कसाबविरुद्ध खटला लढला होता.
हा चित्रपट मॅडॉक फिल्म्स द्वारे निर्मित केला जात आहे. हा पारंपारिक बायोपिक नसल्याचं प्रोडक्शन हाऊसने स्पष्ट केलं आहे. हा चित्रपट फक्त कोर्टरूम ड्रामा आणि २६/११ प्रकरणाशी संबंधित कायदेशीर लढाईंवर आधारित असेल. उज्ज्वल निकम यांनी या प्रकरणात कसाबविरुद्ध पुरावे सादर केले आणि त्याला न्यायालयाकडून शिक्षा मिळवून दिली.
अविनाश अरुण धावरे हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. अरुण धावरे यांनी प्राइम व्हिडिओच्या ‘पाताल लोक’, ‘किला’ आणि ‘थ्री ऑफ अस’ या मालिकेचे दोन्ही सीझन दिग्दर्शित केले आहेत. पटकथा सुमित रॉय यांनी लिहिली आहे. सुमितने ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’, ‘जुबान’ आणि ‘गहराईं’ सारख्या चित्रपटांची पटकथाही लिहिली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar