Breaking News
तुळजाभवानी देवीच्या ऐतिहासिक शिल्पावरून वाद
तुळजापूर - महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या ऐतिहासिक शिल्पावरून आता मतभेद निर्माण होत आहेत. देवी तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देतानाचं 108 फूट उंच भव्य ऐतिहासिक शिल्प तुळजापुरात उभारलं जाणार आहे मात्र हे शिल्प नेमकं कसं असावं यावरून हा वाद निर्माण झाला आहे. आई तुळजाभवानी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं हे शिल्प आता वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. मंदिर संस्थानने जाहीर केलेल्या संकल्पचित्रात आई तुळजाभवानी अष्टभुजा अवस्थेत शिवरायांना भवानी तलवार देताना दाखवलं आहे. मात्र प्रत्यक्ष इतिहासात देवी दोन भुजांमध्ये तलवार देताना आहे. म्हणून हे शिल्प मूळ स्वरूपातच असावं, अशी मागणी पुजारी मंडळ, मराठा क्रांती मोर्चा यांनी केली आहे.
देवीचं मूळ स्वरूप बदलून दाखवलं जात असल्याचा आरोप पुजारी मंडळ, मराठा क्रांती मोर्चा यांनी केला, तर मंदिर संस्थानचं पत्रही यामध्ये नवा वाद निर्माण करतंय. या वादाचे पडसाद आता थेट मुंबईत होणाऱ्या बैठकीपर्यंत गेले आहेत. याबाबत उद्या (17 जून) मुंबईत महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar