आयुक्तांनी केली नागरी कामांची पाहणी
- by
- Dec 08, 2018
- 1063 views
पनवेल : पालिका क्षेत्रात सुरू असलेली रस्त्याची कामे, मुख्यालयासमोरील देवाळे तलावाचे सुशोभीकरण, बंदर रस्त्यावरील एसटीपी प्लॅन्ट, वडाळे तलावाच्या प्रस्तावीत सुशोभीकरणाची जागा, पालिका शाळा, पनवेल येथील मच्छीमार्केट तसेच शहरातील ड्रेनेज व्यवस्थेची आदी विकासकामांची पनवेल पालिका आयुक्तांनी बुधवारी पाहणी केली. शहर सुंदर आणि स्वच्छ कसे बनेल याचा आढावा आयुक्तांनी अधिकार्यांसोबत केलेल्या दौर्यात घेतला. तसेच नागरिकांशी सुसंवाद साधत भविष्यातील पनवेल शहर कसे असावे हे जाणून घेतले..
कचरासेवेसाठी लागणारी वाहने आणि कचराकुंडी खरेदीसाठी लागणारा जवळजवळ 22 कोटी खर्च करून आता पालिकेच्या ताफ्यात नवीन 71 वाहने आली असून लवकरच दोनशेच्या आसपास कचराकुंड्यांचा समावेश केला जाणार आहे. त्याचबरोबर रस्त्यांचे कॉँक्रिटीकरण आणि दुरुस्तीसाठी 23 कोटींच्या कामाची सर्व प्रक्रिया पार पडली असून काही ठिकाणी कामे सुरू आहेत तर काही ठिकाणी सुरू होणार आहेत. .
यामध्ये प्रामुख्याने शहरातील वरदविनायक सोसायटी ते बिरमोळे हॉस्पिटल, परदेशी आळी, महाराणा प्रताप मार्ग, मौलाना आझाद चौक ते कोळीवाडा (5 कोटी 16 लाख), मिडल क्लास सोसायटी उन्नतीकरण, नंदनवन सोसायटीसमोरील रस्ता, ओरियन मॉलच्या पाठीमागील रस्ता, टिळक रोड (2 कोटी 12 लाख), रिलायन्स फ्रेश ते आशियाना, मिडल क्लास सोसायटीमधील रस्त्यांचे कॉँक्रिटीकरण (8 कोटी 56 लाख), गांधी हॉस्पिटल ते एनएच 4 स्व्हिहस रोडचे कॉँक्रिटीकरण व पावसाळी गटार आणि पदपथ दुरुस्ती (1 कोटी 64 लाख), मुंबई हायवे ते मार्केट यार्ड, लाईन आळी शिवाजी महाराज रस्ता (1 कोटी 25 लाख) यासह पालिका क्षेत्रातील ग्रामीण भागात टेक्नोव्हा ते कोयनावेळे, तळोजा-कल्याण एमआयडीसी रस्ता ते नागझरी पाडा, वावंजे ते पालेखुर्द, बौद्धवाडा (रोडपाली), पडघे गाव, रोहिंजण ते पिसार्वे, तुर्भेमार्गे करवलेपर्यंत रस्ता दुरुस्त करणे (4 कोटी 47 लाख), मुंब्रा हायवे ते धरणा कॅम्प, महामार्ग 4 ते धानसर, घोट कॅम्प ते तळोजे फेज 2, कोयनावेळे ते एमआयडीसी 2 कोटी 91 लाख, तळोजा पाचनंद येथील शिराज पटेल बंगलो ते तलाव, जुई गावातील अंतर्गत रस्ते दुरुस्ती, मुंब्रा हायवे ते फरशी पाडा ब्रिज तळोजा पाचनंद आणि मुंब्रा हायवे ते अकस्सा मशीद (4 कोटी 74 लाख) आदी कामे हाती घेण्यात आली आहेत. .
यामध्ये प्रामुख्याने स्वामी हॉटेल ते अमरधाम येथील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरु असून मिडलक्लास हौसिंग सोसायटीमध्ये नव्याने रस्ता बनवण्याचे काम युद्धपातळीवर चालू आहे. .
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत देश झोपडपट्टीमुक्त असावा, असे धोरण केंद्र सरकारने आखले आहे. त्यामुळे शहरातील जुन्या 26 झोपडपट्ट्यांचा सर्वे पूर्ण करण्यात आला असून नव्याने समाविष्ट झालेल्या 29 गावांचा सर्वे चालू आहे. पनवेल हद्दीतील एकूण 60 झोपडपट्टीत 8755 झोपड्या आहेत. त्यांचे लाभार्थी निश्चित करून दुसर्या टप्प्यातील अहवाल शासनाकडे पाठवला आहे. महापालिकेने बनवलेल्या डीपीआरला म्हाडा आणि केंद्र शासनाने हिरवा कंदील दिल्यानंतर शहर झोपडपट्टीमुक्त झालेले पाहायला मिळणार असल्याचे आयुक्त देशमुख यांनी नागरिकांबरोबर सुसंवाद साधताना सांगितले. पाहणी दौर्याप्रसंगी सह आयुक्त श्याम पोशेट्टी, प्रभाग ड प्रमुख श्रीराम हजारे, अग्निशमन अधिकारी अनिल जाधव, स्वच्छता अधिकारी अरुण कांबळे, आर. जाधव आदी उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
ADHARSH SWARAJ 21 AUG TO...
- 27 August, 2025
ADHARSH SWARAJ 14 AUG TO...
- 20 August, 2025
ADHARSH SWARAJ 7 AUG TO...
- 13 August, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya