Breaking News
बाजारात नवसंजीवनी! RBI च्या ऐतिहासिक निर्णयामुळे निफ्टी २५,००० पार
मुंबई – तेजीने घसरणीला ब्रेक,
6 जून रोजी संपलेल्या आठवड्यात भारतीय बेंचमार्क निर्देशांकांनी 1% वाढ नोंदवली, ज्यामुळे दोन आठवड्यांची सलग घसरण संपुष्टात आली. या मागचे महत्वाचे कारण म्हणजे रिझर्व्ह बँकेने दिलेला दुहेरी बूस्टर डोस(आश्चर्यचकित करणारी चलनविषयक धोरण घोषणा.)
आरबीआयचे सरप्राइझ पॅकेज: दर कपात आणि CRR घट, RBI’s Surprise Package: Rate & CRR Cuts
आरबीआयने रेपो दरात 50 बेसिस पॉइंट्सनी कपात आणि सीआरआरमध्ये 100 बेसिस पॉइंट्सनी कपात केली. कॅश रिझर्व्ह रेशो (CRR) 3 टक्क्यांवर आणण्यात आला, जो एप्रिल 2021नंतरचा सर्वात नीचांक आहे. या निर्णयामुळे बाजारात सकारात्मक भावना वाढली.
निफ्टी 25,000 च्या वर; सेन्सेक्समध्ये 738 अंशांची भर, Nifty Crosses 25,000; Sensex Jumps 738 Points
शुक्रवारी, निफ्टी 50 मध्ये तब्बल 252 अंशांची उसळी घेतली आणि मानसिकदृष्ट्या महत्त्वाची 25,000 च्या वरची पातळी गाठली.सेन्सेक्सने 738 अंशांची भर घालून 82,189 वर बंद दिला. दोन्ही निर्देशांकांनी आठवडाभरात 1 टक्क्यांची वाढ नोंदवली. बँक निफ्टीने उत्कृष्ट कामगिरी करत 1.5 टक्के उसळी घेत 56,695 चा नवा सर्वकालीन उच्चांक गाठत सलग चौथ्या आठवड्यात तेजी कायम ठेवली.आणि 56,578.40 वर बंद दिला.
RBI चा सरप्राइझ रेपो/सीआरआर कट निर्णयामुळे बँकिंग, ऑटो आणि रिअल इस्टेट क्षेत्रांनी बाजारात चमकदार कामगिरी केली व दलाल स्ट्रीटवरील गुंतवणूकदारांमध्ये नव्याने आत्मविश्वास निर्माण झाला. तरीही सध्या व्यापार तणाव व टॅरिफबाबत अनिश्चितता सुरूच आहे.
पुढील आठवड्यात घडामोडी वाढणार आहेत. नव्या आयपीओंसह,देशांतर्गत आकडेवारी आणि जागतिक घडामोडींनी बाजाराला दिशा देणार आहेत.
महत्वाचे ट्रिगर- डेटा, IPOs आणि मान्सूनची वाटचाल, Next Week’s Market Triggers Data, IPOs & Monsoon
ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) डेटा, मान्सूनचा प्रगतीचा वेग आणि पेरणीचा ट्रेंड,जागतिक स्तरावर, व्यापार चर्चा आणि अमेरिकेतील बाँड यील्डच्या चढ-उतार
आरबीआयच्या आक्रमक दर कपातीला कमी झालेली महागाई आणि स्थिर GDP चा आधार असल्याने, चालू जागतिक अनिश्चिततेतही गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास टिकून राहण्याची शक्यता आहे.
विदेशी संस्थात्मक गुंतवणुकदारांनी (FIIs) गेल्या आठवड्यात एकूण ₹3,565 कोटींच्या समभागांची विक्री केली. मात्र, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DIIs) ₹25,513 कोटी कॅश सेगमेंटमध्ये गुंतवणूक करून बाजारातील दबाव कमी केला आणि व्यापक बाजाराला मजबूत आधार दिला.
एका अहवालानुसार, FIIs कडे भारतीय समभागांचा 18.8 टक्के हिस्सा आहे, तर इतर उदयोन्मुख बाजारांमध्ये (EMs) हा आकडा 30 टक्के आहे, ज्यामुळे आणखी गुंतवणुकीसाठी मोठी संधी उपलब्ध आहे. रासायनिक, दूरसंचार आणि वित्तीय क्षेत्रे हे FIIs साठी आकर्षक ठरले आहेत. या क्षेत्रांना चीन+1 धोरणासारख्या मजबूत स्ट्रक्चरल ट्रेंड्सने चालना दिली आहे. यामुळे भारत गुंतवणुकीसाठी एक मजबूत पर्याय ठरत आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar