Breaking News
राज्याभिषेक दिनी मुंबई-गोवा महामार्गावर ‘या’ वाहनांना बंदी
महाड -दुर्गराज रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा 2025 च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि शिवभक्तांचा प्रवास सुखकर होण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. मुंबई-गोवा महामार्गावर 5 जून रोजी सायंकाळी 4:00 ते 6 जून 2025 रोजी रात्री 10:00 पर्यंत जड आणि अवजड वाहनांना बंदी असणार आहे. वाकणफाटा नागोठणे ते कशेडीपर्यंत आणि माणगांव-निजामपूर मार्गे पाचाड ते रायगड किल्ला, माणगांव ढालघरफाटा मार्गे पाचाड ते रायगड किल्ला, महाड नातेखिंड मार्गे पाचाड ते रायगड किल्ला या मार्गांवर जड आणि अवजड वाहनांना प्रवेश बंद असेल.
काही अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांना ही बंदी लागू नाही. दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, औषधे, ऑक्सिजन, भाजीपाला आणि रुग्णवाहिका यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या गाड्या नेहमीप्रमाणे सुरू राहतील. जिल्हाधिकारी जावळे यांनी या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar