NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

वैष्णवी आत्महत्या प्रकरण:आरोपी निलेश चव्हाणच्या मुसक्या आवळल्या,

वैष्णवी आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट; आरोपी निलेश चव्हाणच्या मुसक्या आवळल्या, नेपाळ बॉर्डरवरुन उचललं

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. पिंपरी पोलिसांनी आरोपी निलेश चव्हाण याला अटक केली आहे. आरोपी निलेश चव्हाण गेल्या 10 दिवसांपासून फरार होता. पण त्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी निलेश चव्हाण याच्या शोधासाठी आठ टीमची स्थापना केली होती. याच टीमपैकी एका टीमने नेपाळ बॉर्डरवरुन निलेशला ताब्यात घेतलं आहे. लवकरच निलेशला पिंपरी चिंचवडमध्ये आणण्यात येणार आहे.

वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यू नंतर तिचं बाळ हे निलेश चव्हाण याच्याकडे होते. हे बाळ वैष्णवीचे कुटुंबीय घेण्यासाठी निलेशच्या घरी गेले तेव्हा निलेश याने बंदुकीचा धाक दाखवत वैष्णवीच्या माहेरच्यांना धमकवले होते. तसेच वैष्णवीचे बाळ देण्यासही नकार दिला होता असा आरोप वैष्णवीच्या कुटुंबीयांनी केला होता. हे प्रकरण माध्यमांमध्ये आल्यानतंर काही दिवसांनी वैष्णवीचे बाळ एका अज्ञात व्यक्तीने कस्पटे कुटुंबाला सोपवले.

वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी निलेश चव्हाण याच्या विरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच निलेश चव्हाण याच्याकडे वैष्णवीची सासू लता आणि बहीण करिष्मा यांचे मोबाईल फोन होते. हे फोन घेऊन निलेश फरार होता असे बोलले जात होते. याच फोनमध्ये वैष्णवीला मारहाण केल्याचे पुरावे आणि आरोपींमधील संभाषणाचे पुरावे असू शकतात असे बोलले जात आहे. आता निलेशच्या मुसक्या आवळल्यानंतर या प्रकरणात आणखी नवी माहिती उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

निलेश चव्हाणचे कारनामे समोर

निलेश हा हागवणे कुटुंबातील वैष्णवीचा नवरा सुशांत आणि आणि वैष्णवीची नणंद करिश्मा यांच्या अत्यंत जवळचा होता. निलेश चव्हाणने स्वत:च्या बायकोवर केलेला लज्जास्पद प्रकार समोर आला आहे. त्याने आपल्या पत्नीचाही शारीरीक आणि मानसिक छळ केला होता. या प्रकरणात निलेशच्या पत्नीनेही पोलिसात तक्रार दाखल केली होती.

माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार, 3 जून 2018 रोजी निलेश चव्हाणचं लग्न झालं.. सगळं सुरळीत सुरु असताना निलेशच्या पत्नीला जानेवारी 2021 ला आपल्या बेडरूमच्या सिलिंग फॅनला काहीतरी संशयास्पद आढळलं.. तिने याबाबत निलेशला विचारपूस केली.. पण, तिला उडवाउडवीचे उत्तर दिली गेली.. पुन्हा पुढच्या महिन्यात निलेशच्या पत्नीला बेडरूमच्या एसीला काहीतरी संशयास्पद लावल्याचं आढळलं .. याहीवेळी निलेशने तिला उडवाउडवीचे उत्तरे दिलीत.. शेवटी निलेशच्या पत्नीने त्याचा लॅपटॉप तपसला.. आणि सगळा प्रकार तिच्या लक्षात आला.

शरीर संबंध ठेवताना निलेश लाईट का सुरु ठेवायचा? याचंही उत्तर तिला यातून मिळालं.. निलेशच्या पत्नीला त्या लॅपटॅपमध्ये तिचे आणि निलेशचे शरीरसंबंध ठेवतानाचे आक्षेपार्ह व्हिडिओ मिळाले.. निलेश आपले असे आक्षेपार्ह व्हिडिओ काढतो... याची तिला पुसटशीही कल्पना नव्हती.. विशेष म्हणजे लॅपटॉपमध्ये फक्त तिचेच नाही, तर इतर अनेक महिलांबरोबर शरीर संबंध ठेवतानाचे व्हिडिओ आढळले.


रिपोर्टर

  • Rejendra Salaskar
    Rejendra Salaskar

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Rejendra Salaskar

संबंधित पोस्ट