Breaking News
पहलगाम हल्ल्यातील 26 मृतांचे होणार स्मारक
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखालील सरकारने काल पहलगाम येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पहलगाम हल्ल्यातील 26 मृतांचे स्मारक बांधण्याचा निर्णय घेतला. बायसारन मीडोज येथे हे स्मारक उभारले जाणार आहे, या ठिकाणी २२ एप्रिल रोजी पाकिस्तान समर्थित दहशतवाद्यांनी २६ जणांची अमानुष हत्या केली होती.
मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी सांगितले की, हे स्मारक केवळ श्रद्धांजलीच नव्हे, तर दहशतवादाविरोधातील दृढ संकल्पाचा प्रतीक असेल. त्यांनी स्पष्ट केले की स्मारक भव्य आणि सन्माननीय असेल, आणि त्यासाठी सार्वजनिक सूचना मागवण्यात येणार आहेत.
या हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये पर्यटन मोठ्या प्रमाणावर घटले आहे, आणि संपूर्ण प्रदेशातील हॉटेल्समध्ये बुकिंग रद्द करण्यात आले आहे. मुख्यमंत्री अब्दुल्ला यांनी देशभरातील पर्यटन आणि प्रवास संस्थांच्या प्रतिनिधींशी संवाद साधून काश्मीरच्या पर्यटन पुनरुज्जीवनासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar