Breaking News
रेणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
लातूर – मुसळधार पावसामुळे लातूर जिल्ह्यातील रेणा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे रेणापूर, जवळगा आणि खरोळा बंधाऱ्यांवरील पाणीपातळी पूर्ण संचय पातळीच्या वर गेली असून, सध्या बंधाऱ्यांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हवामान केंद्राने पुढील काही दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे, त्यामुळे रेणा नदीकाठच्या गावांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर, रेणा नदीकाठच्या गावांतील नागरिक, शेतकरी आणि नदीकाठी वास्तव्यास असलेल्या व्यक्तींना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी सावध राहावे आणि आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar