Breaking News
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचा पुन्हा एकदा चलो मुंबईचा नारा.
जालना - मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा चलो मुंबईचा नारा दिला आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे आक्रमक झाले असून त्यांनी पुन्हा एकदा मुंबईला जाण्याची घोषणा केली. 28 ऑगस्टला जालन्याच्या अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे मराठा समाजासह मुंबईच्या दिशेने प्रस्थान करतील. तर 29 ऑगस्ट रोजी मुंबईत दाखल झाल्यानंतर आझाद मैदान किंवा मंत्रालयासमोर जरांगे आपल्या आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहेत. याची घोषणा जरांगे यांनी आज अंतरवाली सराटीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना केली. सरकारने 28 ऑगस्टपर्यंत आमच्या सर्व मागण्यांची अंमलबजावणी करावी नसता यावेळी सर्व मागण्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय मुंबईतून पुन्हा माघारी येणार नाही असं जरांगे यांनी म्हटलं आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar