Breaking News
राज्यातील 389 संरक्षित स्मारकांवर प्री-वेडिंग शूटिंग आणि धार्मिक कार्यक्रमांसाठी परवानगी आवश्यक
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाने (ASI) महाराष्ट्रातील ३८९ संरक्षित स्मारकांमध्ये धार्मिक कार्यक्रम आणि प्री-वेडिंग शूटिंगवर बंदी लागू केली आहे. या निर्णयाचा मुख्य उद्देश या ऐतिहासिक स्थळांचे पवित्र्य व ऐतिहासिक महत्त्व जपणे हा आहे.
या निर्णयानुसार, कोणताही व्यक्ती किंवा गट धार्मिक विधी किंवा लग्नाच्या आधीचे छायाचित्रिकरण किंवा व्हिडिओ शूट करण्यासाठी आता परवानगीशिवाय स्मारकांच्या परिसराचा वापर करू शकणार नाही. तसेच परवानगीशिवाय शूटिंगसाठी दोषी आढळल्यास ₹१ लाखांपर्यंत दंड आकारला जाण्याची तरतूद आहे.
हा नियम लागू केल्याने या स्थळांच्या जतन व संरक्षणास चालना मिळेल आणि तेथील पर्यावरणीय व सांस्कृतिक गोष्टींचा आदर राखला जाईल. यासोबतच सार्वजनिक उपस्थितींना या स्थानांचा ऐतिहासिक महत्त्वाचा योग्य अनुभव घेता येईल.
छायाचित्रिकरणासाठी परवानगी घेण्यासाठी संबंधित व्यक्तींना ASI कडे अर्ज करावा लागेल. परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारचे व्यावसायिक किंवा वैयक्तिक शूटिंग करता येणार नाही.
३८९ संरक्षित स्मारक स्थळे
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar