Breaking News
पोलिसांनी उधळून अयोध्येतील राम मंदिरावर दहशतवादी हल्ल्याचा कट
नवी दिल्ली - अयोध्येतील राम मंदिरावर दहशतवादी हल्ल्याचा कट पोलिसांनी उधळून लावला आहे. गुजरात अँटी टेररिस्ट स्क्वाड आणि फरीदाबाद स्पेशल टास्क फोर्सने संयुक्त कारवाई करत दहशतवादी कनेक्शन असलेल्या संशयाखाली एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेला आरोपी १९ वर्षीय, अब्दुल रहमान असून तो अयोध्येतील फैजाबाद येथील रहिवासी आहे. या संशयीताला फरीदाबादमधून अटक करण्यात आली आहे. या तरुणाकडून दहशतवादी हल्ल्याची तयारी सुरू होती. त्याच्याकडून दोन हँड ग्रेनेड जप्त करण्यात आले असून सुरक्षा यंत्रणांनी ते तत्काळ निकामी केले आहेत.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेला संशयित तरुण अब्दुल रहमान पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था ISI च्या संपर्कात होता आणि अयोध्येतील राम मंदिरावर दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत होता. अब्दुल रहमान अनेक कट्टरवादी गटांशी तो जोडलेला होता. त्याचं फैजाबादमध्ये मटणाचं दुकान असल्याचं तपासात समोर आलं आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar