Breaking News
28
00000000
भारताच्या फिरकीपुढे न्यूझीलंडचे लोटांगण!
भारताचा न्यूझीलंडला नमवत ४४ धावांनी शानदार विजय
वरूण चक्रवर्ती व टीम इंडियाचे फिरकीपटू ठरले स्टार
IND vs NZ: भारताने न्यूझीलंडला अटीतटीच्या सामन्यात वरूण चक्रवर्तीचे ५ विकेट्स आणि फिरकी गोलंदाजीच्या जोरावर नमवत शानदार विजय मिळवला आहे.
भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय (फोटो-बीसीसीआय)
IND vs NZ Highlights in Marathi: श्रेयस अय्यरची ७९ धावांची खेळी, वरूण चक्रवर्तीचे ५ विकेट्स व फिरकीपटूंची भेदक गोलंदाजी या जोरावर भारताने न्यूझीलंडला नमवत ४४ धावांनी मोठा विजय नोंदवला. भारताच्या फिरकीपटू चौकडीने ९ विकेट्स घेत किवीच्या धावांना वेसण घातलं. या विजयासह भारताने गुणतालिकेत पहिलं स्थान गाठलं आहे. टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीत गट टप्प्यातील तिन्ही सामने जिंकत उपांत्य फेरीत पोहोचला आहे. यासह भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीतील उपांत्य फेरीचा सामना ऑस्ट्रेलियाविरूद्ध खेळवला जाणार आहे.
दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर रविवारी २ मार्च रोजी खेळल्या गेलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या शेवटच्या गट सामन्याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. उपांत्य फेरीतील ४ संघ आधीच ठरले होते पण आता कोणता संघ कोणत्या संघाविरूद्ध खेळणार हे निश्चित होणं बाकी होत आणि ते भारत-न्यूझीलंड सामन्याच्या निकालावर ठरणार होते. यासह आता उपांत्य फेरीचे संघ ठरले असून भारत वि. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड वि. दक्षिण आफ्रिका हे संघ असणार आहेत.
भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीतील तिसरी नाणेफेक गमावली पण सलग तिसरा सामना मात्र जिंकला आहे. नाणेफेक गमावत भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला होता आणि भारताची सुरूवात खूपच खराब झाली. भारताने ३० धावांमध्ये ३ विकेट गमावले होते. यानंतर श्रेयस अय्यरने अक्षर पटेलच्या साथीने ९८ धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. श्रेयस अय्यरने ७९ धावांची तर अक्षर पटेलने ४२ धावांची खेळी केली. न्यूझीलंडकरून वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीने ५ विकेट्स घेत भारताला जास्त धावा करण्याची संधी दिली नाही.
भारताने दिलेले २५० धावांचे लक्ष्य न्यूझीलंड सहज गाठेल असं वाटत होते. पण भारताने मोठी खेळी करत ४ फिरकीपटू खेळवले आणि किवी संघ फिरकीसमोर फेल ठरले. न्यूझीलंडचा फक्त केन विल्यमसन १२० चेंडूत ७ चौकारांसह ८१ धावा करत बाद झालाय याशिवाय कोणताही फलंदाज ३० धावांचा टप्पा गाठू शकला नाही. भारताच्या फिरकी गोलंदाजांनी किवी संघाला एकेका धावेसाठी मेहनत करायला लावली. अखेरीस भारताने न्यूझीलंडला सर्वबाद करत मोठा विजय नोंदवला.
वरुण चक्रवर्ती ठरला विजयाचा शिल्पकार
भारत-न्यूझीलंड संघांमधल्या सामन्यात गोलंदाजांनी निर्विवाद वर्चस्व गाजवलं. न्यूझीलंडसमोर विजयासाठी 250 धावांचं माफक आव्हान होतं. भारताच्या फिरकी गोलंदाजांनी न्यूझीलंडचा अख्खा डाव 205 धावांत गुंडाळला. लेग स्पिनर वरुण चक्रवर्ती भारताच्या विजयाचा प्रमुख शिल्पकार ठरला. त्यानं 42 धावांत न्यूझीलंडचा निम्मा संघ माघारी धाडला. कुलदीप यादवनं दोन, तर अक्षर पटेल आणि रवींद्र जाडेजानं एकेक विकेट काढली.
न्यूझीलंड-दक्षिण आफ्रिकेशी भिडणार तर भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होईल
रविवार 2 मार्च रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या शेवटच्या गट सामन्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. उपांत्य फेरीसाठी चार संघ आधीच निश्चित झाले होते पण आता कोणता संघ कोणाविरुद्ध खेळेल हे पाहणे बाकी होते. हे भारत-न्यूझीलंड सामन्याच्या निकालावरून ठरवायचे होते. दुसऱ्या गटापूर्वीच, दक्षिण आफ्रिकेने पहिले स्थान मिळवले होते, तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर होता. टीम इंडियाच्या विजयामुळे आता चित्र स्पष्ट झाले आहे, जिथे भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होईल, तर न्यूझीलंडचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होईल.
पहिला उपांत्य सामना - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 4 मार्च दुबई (South Africa vs New Zealand)
दुसरा उपांत्य सामना - दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड, 5 मार्च लाहोर (India vs Australia Semifinal)
दोन्ही सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता खेळवले जातील. नाणेफेक दुपारी 2:00 वाजता होईल.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar