मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

अभिनेते सयाजी शिंदेंचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

अभिनेते सयाजी शिंदेंचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुंबई - मराठी, हिंदी बरोबरच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी गाजवणारे अभिनेते गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रातही सक्रीय कार्यरत आहेत. दुष्काळी भागात त्यांनी घेतलेले वृक्ष लागवडीचे काम वाखाण्याजोगे आहे. चित्रपटांमधून राजकीय पुढाऱ्याची भूमिका रंगवणारे सयाजी शिंदे हे आता प्रत्यक्ष आयुष्यातही राजकीय आखाड्यात उतरले आहेत. शिंदे यांनी आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे. यामुळे विधानसभा निवडणूका डोळ्यासमोर असताना अजित पवारांच्या पक्षाला एक ग्लॅमरस चेहरा लाभला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज मुंबईत पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत अभिनेते सयाजी शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला. अभिनेते सयाजी शिंदे हे आता पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून काम करणार आहेत.

पक्ष प्रवेश कार्यक्रमादरम्यान मंत्री छगन भुजबळ यांनी अभिनेते सयाजी शिंदे यांचं कौतुक केलं. भुजबळ म्हणाले, “आता उद्या दसरा आहे. पण आम्हाला आजच दसरा साजरा करण्याचं भाग्य लाभलं. खरं तर महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर सयाजी शिंदे यांनी आपल्या कामाने मोठा ठसा उमटवला आहे. त्यांनी मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य अशा विविध भाषेच्या चित्रपटांमध्ये अभिनय केला. ते अभिनेते आहेतच, पण आता ते नेते देखील झाले आहेत. सयाजी शिंदे यांनी सामाजिक क्षेत्रात मोठं काम केलं आहे. राज्यात ठिकठिकाणी वृक्षारोपण त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे”, असं म्हणत मंत्री छगन भुजबळ यांनी सयाजी शिंदे यांचं कौतुक केलं.


रिपोर्टर

  • Rejendra Salaskar
    Rejendra Salaskar

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Rejendra Salaskar

संबंधित पोस्ट