Breaking News
गाय आमची माता, तिला जनावरांच्या यादीतून वगळा
बद्रीनाथ ज्योतिर्मठ पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी केंद्र सरकारला विनंती केली आहे की “गायीला जनावरांच्या श्रेणीतून वगळा”. ते म्हणाले, “सरकारने बनवलेल्या जनावरांच्या यादीत गायीचा समावेश आहे. परंतु, सनातन धर्मात गायीला मोठी प्रतिष्ठा आहे. गायीला आम्ही माता म्हणून पूजतो. त्यामुळे गायीला जनावर म्हणणं चुकीचं आहे”. अविमुक्तेश्वरानंद यांनी गौ प्रतिष्ठा ध्वज स्थपना यात्रेचं आयोजन केलं आहे. ही यात्रा नुकतीच ओडिशात दाखल झाली आहे. यावेळी त्यांनी गायीला जनावरांच्या यादीतून वगळण्याची मागणी केली. अविमुक्तेश्वरानंद हे गेल्या अनेक वर्षांपासून गायींचं संरक्षण व संवर्धन करण्यासाठी काम करत आहेत. यासाठी त्यांनी वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन लोकांना प्रेरित केलं आहे.
स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले, “गायीला संरक्षण मिळवून देणे व गायींची सेवा करणे हा या यात्रेचा उद्देश आहे”. ओडिशात दाखल झाल्यावर अविमुक्तेश्वरानंद यांनी तिथल्या प्रसिद्ध लिंगराज मंदिरात जाऊन पूजा केली, तसेच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, “मी येथे गौ प्रतिष्ठा ध्वज प्रतिष्ठापना यात्रेसाठी आलो आहे. गोमातेचं सरंक्षण व संवर्धनासाठी सरकारने कायदा करावा, ही आमच्या या यात्रेची प्रमुख मागणी आहे. त्यासाठीच आम्ही ही यात्रा काढली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar