मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत पहिली रेल्वे अयोध्येसाठी

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत पहिली रेल्वे अयोध्येसाठी

कोल्हापूर -राज्यात सर्व धर्मीयांमधील 60 वर्ष वय आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थ दर्शन यात्रेची मोफत संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राबविण्यात येत आहे. मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत राज्यात पहिली रेल्वे कोल्हापूर जिल्ह्यातून आयाध्येसाठी 28 सप्टेंबर 2024 रोजी जाणार असल्याची माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

याकरीता कोल्हापूर जिल्ह्याअंतर्गत तीर्थदर्शनासाठी 2 हजार 146 अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी 1 हजार 983 अर्ज पात्र झाले असून त्यामधील 800 लाभार्थी लॉटरी पद्धतीने निवडले गेले आहेत. “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना” निवड झालेल्या ज्येष्ठ नागरिकांचे तसेच राज्यात प्रथम क्रमांकाने कोल्हापूर जिल्हा “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना” या योजनेचा लाभ घेत असल्याबाबत सर्वांचे पालकमंत्री तथा मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या जिल्हा समितीचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी अभिनंदन केले.

सामाजिक न्याय – विशेष सहाय्य विभागामार्फत राज्यातील सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिक जे 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांना राज्य आणि भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची, दर्शनाची संधी देण्यासाठी “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना” सुरु करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. ही योजना ज्येष्ठ नागरिकांना राज्य तथा देशातील तीर्थ स्थळांना जाऊन मनःशांती तसेच आध्यात्मिक पातळी गाठणे सुकर व्हावे, यासाठी राबविण्यात येत आहे.

14 जुलै च्या शासन निर्णयानुसार लाभार्थीची निवड करण्यासाठी जिल्हा स्तरावर समिती स्थापन करण्यात आली आहे. प्रत्येक तालुका ठिकाणच्या लोकसंख्येनुसार तालुका निहाय कोटा निश्चित करून कोट्यापेक्षा जास्त अर्जाची निवड लॉटरीद्वारे केली आहे. ज्या तालुक्यातील अर्ज कमी आले आहेत. त्या तालुक्यांचा कोटा सर्वाधिक अर्ज येणाऱ्या तालुक्याला देण्यात आला आहे. सामाजिक न्याय भवन, कोल्हापूर या ठिकाणी लकी ड्रॉ करण्यात आला. 800 अर्जांची निवड करुन उर्वरित अर्ज प्रतिक्षाधिन ठेवण्यात आले आहेत.

करवीर – 215, हातकणंगले – 171, शिरोळ – 79, कागल – 118, पन्हाळा – 49, भुदरगड – 32, गगनबावडा – 2, शाहुवाडी -3, राधानगरी – 40, आजरा – 3, गडहिंग्लज – 48 व चंदगड 40 असे एकूण 800 लाभार्थी तालुक्यातून निवडले गेले आहेत.

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेच्या लाभार्थ्यांना आयोध्येला घेवून जाणारी रेल्वे दि. 28 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 9.50 वाजता छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर येथून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ होणार आहे.

निवड झालेल्या लाभार्थ्यांना इंडीयन रेल्वे कॅटरीन अॅन्ड टुरीझम कारर्पोरेशन लिमिटेड (भारत सरकार) दि. 28 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 9.50 वाजता छत्रपती शाहु महाराज टर्मिनस कोल्हापूर येथुन घेऊन अयोध्या येथे 30 सप्टेंबर 2024 रोजी अयोध्या धाम येथे पोहचेल आणि अयोध्या दर्शन घेऊन परत 1 ऑक्टोबर 2024 रोजी अयोध्या धाम येथून लाभार्थी ज्येष्ठ नागरीकांना घेऊन निघेल तर 3 ऑक्टोबर 2024 रोजी छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर येथे पोहचेल. यामध्ये निवड झालेल्या लाभार्थ्यांचा प्रवास, निवास, भोजन इ.खर्च महाराष्ट्र शासनाच्या वतीने करण्यात येणार आहे.


रिपोर्टर

संबंधित पोस्ट