Breaking News
मनोज जरांगे यांचे सहाव्यांदा उपोषण आंदोलन सुरू
जालना - मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाला सुरुवात झाली आहे. मध्यरात्री 12 वाजेपासून जरांगे यांच्या आमरण उपोषणाला पुन्हा सुरुवात झाली. ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्याच्या मागणीवर मनोज जरांगे ठाम असून मराठवाडा मुक्तीसंग्रम दिनाचे औचित्य साधून जरांगे यांनी आमरण उपोषणाची हाक दिली आहे. अंतरवाली सराटी मधील मनोज जरांगे यांचे हे सहावे आमरण उपोषण आहे.
ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्याच्या मागणीवर मनोज जरांगे ठाम असून त्या साठी त्यांनी पुन्हा एकदा उपोषणाचे हत्यार उपसले आहे. आजचे मराठवाडा मुक्तीसंग्रम दिनाचे औचित्य साधून जरांगे आमरण उपोषणाला बसलेत. जो पर्यंत मागण्या पूर्ण होणार नाहीत तो पर्यंत मागे न हटण्याचा ठाम निर्धार जरांगे यांनी केला आहे. फडणवीस यांना ही संधी दिली असून पुन्हा मला दोष देऊ नका असं म्हणत आरक्षण न दिल्यास गुडघे टेकायला लावू असा इशारा देखील जरांगे यांनी उपोषणाला बसल्यानंतर सरकारला दिला आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर