मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

मुंबईत गोविंदांच्या सुरक्षेसाठी खास उपाययोजना

 मुंबईत गोविंदांच्या सुरक्षेसाठी खास उपाययोजना; दहीहंडी पथकांसाठी क्रेन, दोरी, सेफ्टी बेल्टची व्यवस्था, यंदा दहीहंडीच्या दिवशी जोरदार पावसाचा इशारा,

Dahi Handi 2024 : दहीहंडी उत्सव अवघ्या दोन दिवसांवर आला असतानाच मुंबईत दहीहंडी (Dahi Handi 2024) सराव शिबिरांचं आयोजन मोठ्या प्रमाणावर होत असल्याचं पाहायला मिळत आहे. काल (24 ऑगस्ट) सकाळपासूनच मुंबईत मुसळधार पाऊस पडत असला तरी गोविंदांचा उत्साह तसूभरही कमी झाला नाही. यंदा दहीहंडीला जोरदार पावसाचा इशारा दिला असानाच आता गोविंदांच्या सुरक्षेसाठी पालकमंत्री पुढे सरसावले आहेत. गोविंदा सराव पथकांना मुंबई महापालिकेने क्रेन, दोरी आणि सुरक्षिततेसाठी सेफ्टी बेल्ट पुरवावे, असे आदेश पालकमंत्री दीपक केसरकरांनी दिले.

'दहिहंडी उत्सवासाठी खर्च करायला काय हरकत?'

गोविंदा सराव पथकांना मुंबई महापालिकेने क्रेन आणि दोरी आणि सुरक्षिततेसाठी सेफ्टी बेल्ट पुरवावे, असे आदेश पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मुंबई महापालिका प्रशासनाला दिले आहेत. गणेशोत्सवासाठी मुंबई महापालिका एवढा खर्च करीत असते, तर दहिहंडी उत्सवासाठी खर्च करायला काय हरकत आहे? अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

दहीहंडीच्या दिवशीही पुरवली जाणार विशेष सुरक्षा

गोविंदा, दहिहंडी आणि उंच मानवी थर ही मुंबईची संस्कृती आणि ओळख आहे. ही ओळख टिकावी म्हणून प्रो गोविंदांसाठी जिल्हा विकास नियोजन विभागातून दोन कोटींचा निधी देण्यात आला. मात्र मुंबईत विविध ठिकाणी जी गोविंदा पथकं सराव करत असतात त्यांना मुंबई महापालिकेच्या विभाग कार्यालयांनी क्रेन, दोरी, सेफ्टी बेल्ट पुरवावे, असे आदेश पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिले आहेत. तसेच मंगळवारी गोपाळकालाच्या दिवशी देखील ही सेवा पुरवावी, असेही आदेश त्यांनी दिले आहेत.

पुढील वर्षी क्रेनची संख्या आणखी वाढवणार

वरच्या दोन-तीन थरांवर असलेल्या गोविंदांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्या, दुर्घटना घडून कोणती जिवितहानी होऊ नये यासाठी सुरक्षिततेच्या उपाययोजना म्हणून हा खर्च करावा, असेही आदेश केसरकरांनी दिले आहेत. असं पाऊल उचलण्यात येत असलेलं हे पहिलंच वर्ष असून किती आणि कशाप्रकारे क्रेन पुरवता येतील त्याचा विचार करावा आणि पुढील वर्षी जास्तीतजास्त मंडळांना क्रेन पुरवाव्या, असंही पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पालिका प्रशासनाला सांगितलं आहे.

सरावादरम्यान सेलिब्रिटींची उपस्थिती

मुसळधार पाऊस असताना देखील गोविंदांनी थरावर थर रचण्याचा विक्रम केल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेना शिंदे गट दिंडोशी विधानसभा प्रमुख वैभव भराडकर यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी सराव शिबिराला अभिनेते प्रसाद ओक (Prasad Oak), निर्माते प्रवीण तरडे सोबत खासदार रवींद्र वायकर,खासदार नरेश मस्के यांनी देखील हजेरी लावली होती. कुरार येथे आयोजित करण्यात आलेल्या या सराव शिबिराला मुंबईतील शंभर पेक्षा अधिक गोविंदा पथकांनी हजेरी लावली. विशेष म्हणजे मुसळधार पाऊस असताना देखील गोविंदांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता.

घाटकोपरमध्ये तमन्ना भाटिया, स्वप्निल जोशीची उपस्थिती

घाटकोपरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनसेच्या वतीने चोर हंडी म्हणजेच दहीहंडी सराव शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. मनसेचे विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांच्या वतीने या भव्य दिव्य चोर हंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या हंडीला प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि अभिनेता स्वप्नील जोशी उपस्थित होते. या वेळी दोन्ही कलाकारांनी दहीहंडी उत्सवाचं कौतुक केलं.आपल्याला हा उत्सव लहानपणापासूनच आवडत असून यात लहान लहान मुलींचा सहभाग बघून आनंद होत असल्याचं तमन्ना भाटियाने सांगितलं. तर हा उत्साह आनंद पाहून उर भरून येत असल्याचं स्वप्नील जोशी म्हणाला.

'घाटकोपर विधानसभेची हंडी मनसेच फोडणार'

मुंबईला उत्सवाची परंपरा आहे, स्थानिक गोविंदांना प्रोत्साहन देण्यासाठी या दहीहंडीचं आयोजन केलं असून यंदाच्या वर्षी घाटकोपरच्या विधानसभेची हंडी मनसेच फोडणार असल्याचं मनसे विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल म्हणाले.


रिपोर्टर

  • Rejendra Salaskar
    Rejendra Salaskar

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Rejendra Salaskar

संबंधित पोस्ट