Breaking News
सरकारच्या शिष्टमंडळाने घेतली मनोज जरांगे यांची भेट.
जालना - सरकारच्या शिष्टमंडळाने आज अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंची भेट घेतली. भाजपा आमदार नारायण कूचे, बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत, तुळजापुरचे भाजपा आमदार राणा जगजित सिंह यांच्यासह शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी सरकारच्या वतीने आज जरांगे यांची भेट घेतली. सरकार आणि मनोज जरांगे यांच्यात समन्वय साधून जे समाजाचे प्रश्न आहेत ते सोडवून घेण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतोय अशी प्रतिक्रिया बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी भेटी नंतर दिली.
समाजाच्या हिताच्या गोष्टी घडाव्यात असं आम्हाला वाटतं, जरांगे यांनी तशी भूमिका घेतलेली आहे. ज्या समाजाच्या हिताच्या गोष्टी आहेत, त्या शासनाकडून सोडवून घेण्यासाठी आधी पण प्रयत्न केला आणि पुढे सुद्धा करू असं आमदार राजेंद्र राऊत यांनी म्हटलं. दरम्यान आम्ही मनोज जरांगे यांची भेट घेतली असून त्यांच्या मागण्यांचा पाठपुरावा करू असं भाजपा आमदार राणा जगजित सिंह यांनी सांगितले. आज आम्ही राजकारण बाजूला ठेवून समाजासाठी काय योग्य आहे त्याचा मार्ग काढगाण्यासाठी प्रयत्नशील आहे असं आमदार राणा जगजित सिंह म्हणाले. दरम्यान सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्या भेटीला अचानक अंतरवाली सराटीत आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे