Breaking News
पठ्ठ्याने गाजवलं पॅरीस! कोल्हापुरच्या स्वप्नील कुसाळेची ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये धडक
क्रीडा
मुंबई - पॅरिसमध्ये सुरू असलेल्या ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्रातल्या कोल्हापुरमधील स्वप्नील कुसाळेने चांगली कामगिरी केली. तो ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे. स्वप्नीलने ५९० गुणांसह सातवे स्थान मिळवून अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. भारताची आणखी एक शिलेदार ऐश्वर्या प्रताप सिंग ११व्या क्रमांकावर राहिली अन् ती अंतिम फेरीला मुकली. खरे तर अव्वल आठ खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र ठरतात. ऐश्वर्या प्रतापला पहिल्या आठमध्ये स्थान मिळवता न आल्याने तिचे आव्हान संपुष्टात आले. त्यामुळे कोल्हापुरचा पठ्ठ्या भारताला पदक मिळवून देणार का हे पाहण्याजोगे असेल.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar