Breaking News
मंगळ मोहीम यशस्वी करून वर्षभरानंतर परतले NASA चे शास्त्रज्ञ
वॉशिग्टन डी.सी. -अमेरिकेच्या ‘NASA’ या अंतराळ संशोधन संस्थेचे गेले वर्षभर सुरू असलेले ‘Mars Mission’ ६ जुलैला पूर्ण झाले आहे . या मंगळ मोहिमेतील चार शास्त्रज्ञ हे वर्षभराच्या वास्तव्यानंतर त्यांच्या यानातून नुकतेच पृथ्वीवर परतले आहेत. या यानात मंगळासारखे वातावरण तयार करण्यात आले होते. हॅस्टन,आन्का सेलारिऊ,रॉस ब्रॉकवेल आणि नॅथन जोन्स हे चार शास्त्रज्ञ या मोहिमेत सहभागी झाले होते. या मोहिमेतील यानाने पृथ्वीवरून मंगळावर उड्डाण केले नव्हते,तर त्यांच्यासाठी ‘नासा’ने ह्यूस्टनमधील जॉन्सन स्पेस सेंटरमध्ये मंगळाच्या वातावरणासारखीच एक राहण्यासाठी जागा तयार केली होती.
या चौघांनी २५ जून २०२३ रोजी ३ डी-प्रिंडेट राहण्याची सोय असलेल्या या कक्षेत प्रवेश केला.मिशनचे फिजिशियन आणि वैद्यकीय अधिकारी जोन्स म्हणाले की,बंदिवासात असलेल्या शास्त्रज्ञांनी ३७८ दिवस वेगवेगळे संशोधन केले.हे चार वैज्ञानिक मंगळ ग्रहासारख्या वातावरणात १,७०० चौरस फूट जागेत राहत होते. भविष्यात मंगळावरील संभाव्य आव्हाने कशी असतील, याचा अनुभव त्यांनी घेतला. या आव्हानांमध्ये मर्यादित संसाधने, लोकांपासून वेगळे राहणे आणि पृथ्वीशी संपर्कात २२ मिनिटांचा विलंब यांचा समावेश होता. अशा आणखी दोन मोहिमा आखण्यात आल्याचे ‘नासा’ने म्हटले आहे.
१२ महिन्यांहून अधिक काळ बाहेरील जगापासून वेगळे राहिल्यानंतर शनिवारी दि. ६ जुलैला संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास हे चार शास्त्रज्ञ पृथ्वीवर परतले.भविष्यात मंगळावर मोहीम पाठवताना येणार्या आव्हानांना तोंड देणे हा या मोहिमेचा उद्देश आहे.या शास्त्रज्ञांची त्याठिकाणी स्पेस वॉक म्हणजेच ‘मार्सवॉक’देखील केले.याशिवाय त्यांना त्या ठिकाणी भाजीपालाही पिकवला.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar