Breaking News
15 ऑगस्ट ते 31 एप्रिल कालावधीत 3 टप्प्यात करणार सर्वेक्षण
नवी मुंबई ः अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘निश्चय केला नंबर पहिला’ हेच आपले उद्दिष्ट असल्याचे सांगत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी ‘स्वच्छ सर्वेक्षण 2022’ करिता आजपासून सर्व नागरिकांच्या सहयोगाने नवी मुंबई महानगरपालिका सज्ज झाली असल्याचे जाहीर केले.
75 व्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून महापालिका मुख्यालयात आयोजित ‘स्वच्छतेचे पुढचे पाऊल’ या कार्यक्रमाप्रसंगी आयुक्त आपले मनोगत व्यक्त करीत होते. फेसबुक लाईव्ह व यू ट्युब लाईव्ह व्दारे अनेक नवी मुंबईकर नागरिक या कार्यक्रमात सहभागी झाले होते. केवळ इच्छ़ा म्हणून आपण देशातील सर्वात स्वच्छ शहर बनणे हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवलेले नाही तर आपल्या शहरामध्ये ती क्षमता आहे. यादृष्टीने महानगरपालिका प्रयत्नशील आहेच तथापि नागरिकांच्या संपूर्ण सहभागाशिवाय ते शक्य नाही हे स्पष्ट करीत नागरिकांनी घरातील दररोज निर्माण होणारा कचरा ओला, सुका व घरगुती घातक अशा प्रकारे वेगवेगळा करावा, त्यासाठी वेगवेगळे डबे ठेवावेत व महानगरपालिकेच्या स्वच्छतामित्रांकडे तो कचरा वेगवेगळा द्यावा. केवळ एवढेच केले तरी स्वच्छतेचे 90 टक्के उद्दिष्ट साध्य होईल असे सांगत नवी मुंबईकर नागरिक ते करतील असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला. कचरा वर्गीकरण ही सर्वात महत्वाची बाब असून ज्या सोसायट्या वर्गीकरण केलेला कचरा देणार नाहीत त्यांचा कचरा उचलला जाणार नाही हे आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले. स्वच्छ सर्वेक्षण 2021 मधील काही उल्लेखनीय उपक्रमांची व्याप्ती वाढविण्याचा मनोदय आयुक्तांनी व्यक्त केला. याप्रसंगी मलनि:स्सारण विषयक काम करणार्या 8 सफाईमित्रांचा तसेच शौचालय व्यवस्थापनाचे काम करणार्या 8 स्वच्छतामित्रांचा आयुक्तांच्या हस्ते शाल व वृक्षरोपे प्रदान करून सन्मान करण्यात आला.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya