Breaking News
मुंबई ः निश्चित केलेल्या धोरणानुसार महागाई अपेक्षित दराच्या टप्प्यांमध्ये आल्याने रिझर्व्ह बँकेला दिलासा मिळाला आहे. जुलै महिन्यात महागाई दर 5.59 टक्के राहिला. गेल्या तीन महिन्यांमधली ही महागाईची नीचांकी पातळी आहे. रिझर्व्ह बँकेने त्यासाठी दोन ते चार टप्प्यांदरम्यान श्रेणी निश्चित केली आहे. यापूर्वी सलग दोन महिने महागाईचा दर सहा टक्क्यांच्या वर होता.
जुलै महिन्यात किरकोळ महागाई वार्षिक आणि मासिक अशा दोन्ही आधारांवर खाली आली. जूनमध्ये किरकोळ महागाईचा दर 6.26 टक्के होता. जुलैमध्ये महागाई 0.74 टक्क्यांनी कमी झाली. गेल्या वर्षीच्या जुलैमध्ये किरकोळ महागाईदर 6.73 टक्के होता. या वर्षी मे महिन्यात महागाई दर सहा महिन्यांच्या सर्वोच्च पातळीवर होता. रॉयटर्सने सर्वेक्षण केलेल्या 48 अर्थतज्ज्ञांनी जुलैमध्ये महागाई 5.78 टक्क्यांपर्यंत खाली येण्याचा अंदाज व्यक्त केला होता. लक्षणीय म्हणजे स्वस्त खाद्यपदार्थांमुळे महागाईत घट झाली आहे. पुरवठा साखळीतला अडथळा दूर झाला आहे. त्यामुळे वस्तूंची उपलब्धता वाढली आहे.राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या महिन्यात अन्नपदार्थांचा महागाई दर 3.96 टक्क्यांवर आला. जूनमध्ये हाच दर 5.15 टक्क्यांच्या पातळीवर होता. दरम्यान, जून महिन्यातल्या औद्योगिक उत्पादनाचे आकडेही आले आहेत. यात वार्षिक आधारावर 13.6 टक्के वाढ झाली आहे. कोरोनामुळे लागू असलेल्या निर्बंधांचा फटका उद्योग क्षेत्राला बसला आहे. मे मध्ये वाढीचा दर 29.3 टक्के होता. गेल्या वर्षी जूनमध्ये औद्योगिक उत्पादन दर 16.6 टक्क्यांनी घटला होता. जून महिन्यात सर्वात मोठी वाढ खाण क्षेत्रात झाली. या क्षेत्रातलं उत्पादन सुमारे23 टक्क्यांनी वाढलं. उत्पादन क्षेत्रात 13 टक्के तर वीजनिर्मिती क्षेत्रात 8.3 टक्क्यांनी वाढ झाली.
एप्रिल ते जून तिमाहीत वार्षिक आधारावर 45 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2020 च्या पहिल्या तिमाहीत कोविड-प्रभावित औद्योगिक उत्पादनात सुमारे 35.6 टक्के घट झाली. गेल्या वर्षी मार्चमध्ये 18.7 टक्क्यांची तीव्र घट झाली होती तर एप्रिलमध्ये ही घट 57.3 टक्के होती . मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसचे मुख्य अर्थतज्ज्ञ निखिल गुप्ता यांनी जुलैचा महागाई दर अंदाजापेक्षा कमी असल्याचे मान्य केलं आहे; परंतु जून औद्योगिक उत्पादन दर अपेक्षेनुसार आहे. नाईट फ्रँक इंडियाचे संशोधन संचालक विवेक राठी यांच्या मते, काही काळ उच्च पातळीवर राहिलेल्या महागाईचा दर 5.59 टक्के होणं हा एक दिलासा आहे. रिझर्व्ह बँकेचा रेपो दर कमी महागाईच्या स्थितीत ठेवल्याने सामान्य लोकांना आणि कंपन्यांना कमी व्याजदराचा लाभ फार काळ मिळत राहील. एम्के वेल्थ मॅनेजमेंटचे रिसर्च हेड डॉ. जोसेफ थॉमस म्हणतात की महागाई नक्कीच कमी झाली आहे; परंतु हे तात्पुरतं आहे आणि दीर्घकाळ असंच राहील असं म्हणणं घाईचं ठरेल. तथापि, यामुळे रिझर्व्ह बँकेकडून काही काळ धोरणात्मक पातळीवर महागाईचा दबाव कमी होईल.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya