Breaking News
होळीचा सण भारतात मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो. आपल्यासारख्या शहरी माणसांसाठी आपल्या आप्तेष्टांसोबत आणि शेजार्या-पाजार्यांसोबत हा रंगांचा सण साजरा करणे हे आनंद व्यक्त करण्याचे आणि अनुभवण्याचे अजून एक निमित्त असते. पण बदलत्या काळानुसार होळीचा चेहराही बदलला आहे. एके काळी हा सण फुले आणि नैसर्गिक घरगुती रंगांनी खेळला जायचा, त्या जागी आता चकाकणारे रासायनिक रंग आले, पाण्याचे फुगे आणि पाण्याच्या फॅन्सी पिचकार्या आल्या आहेत. सहाजिकच हे घटक घेऊन आले आहेत डोळ्यांसाठी इजा.
आनंदी होळीसाठी डोळ्यांची काळजी घेण्याच्या टिप्स :
अनेकांना असे वाटते की, कॉन्टॅक्ट लेन्सेस होळीसाठी सुरक्षित पर्याय आहेत. पण वस्तुस्थिती अशी आहे की, तुमच्या डोळ्यात जाणारा प्रत्येक रंग ते शोषून घेत असतात आणि तो एका ठिकाणी साकळतो. कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरायचेच असतील तर डिस्पोसेबल कॉन्टॅक्ट लेन्स वापरावे आणि धुळवड किंवा रंगपंचमी खेळून झाल्यावर ते टाकून द्यावे. चष्मे वापरणार्या व्यक्तींना तर खूपच समस्यांना सामोरे जावे लागते. त्यांनी चष्मा घातला तरी चष्म्याच्या फ्रेमच्या खाचाखोचांमध्ये रंग अडकून बसतात. रिमलेस चष्मे सहज तुटू शकतात. त्यामुळे चष्मा घालणे शक्यतो टाळावे.
नैसर्गिक रंग हा सुरक्षित पर्याय आहे. बेसन आणि हळदीच्या मिश्रणाने पिवळा किंवा गुलमोहराने नारिंगी, पाण्यात भिजवलेल्या बिटाने गुलाबी रंग, लाल रंगासाठी जास्वंदाचा वापर केला तरी तेवढीच मजा येते! यंदाच्या होळीमध्ये तुमच्या डोळ्यांनाही रंगांचा सोहळा अनुभवू दे!
डॉ.वंदना जैन, अगरवाल आय हॉस्पीटल
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya