मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

नियम मोडणार्‍यांवर होणार कडक कारवाई

पनवेल ः कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे खबरदारीचे सर्व उपाय सक्तीने राबविण्याचे आदेश आयुक्त सुधाकर देशमुख यांनी शुक्रवारी, 19 फेब्रुवारी रोजी दिले. मास्क न वापरणार्‍यांना 500 रूपयांचा दंड आकारला जाईल तर गृहविलगीकरणात असताना बाहेर फिरल्याचे निदर्शनास आल्यास त्याच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.

पनवेल महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी शुक्रवारी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त, उपआयुक्त, सर्व विभाग कार्यालयांचे सहाय्यक आयुक्त तसेच संबंधित अधिकारी यांच्यासमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली. त्यावेळी आयुक्त सुधाकर देशमुख यांनी परिस्थितीचा आढावा घेवून यंत्रणेला आवश्यक ते निर्देश दिले. पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात कोरोना विषाणूचा संसर्ग पूर्णपणे नियंत्रणात येत असतानाच मागील काही दिवसांत रुग्ण संख्या वाढत असल्याने संपूर्ण यंत्रणेने सतर्क राहणे गरजेचे आहे. वाढती रुग्ण संख्या पाहता घरी विलगीकरण राहणार्‍यांच्या हातावर शिक्के मारावेत, त्यांनी नियम मोडला तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. लग्न समारंभ आयोजनाचे नियम मोडणार्‍या आयोजकांसह कार्यालय व्यवस्थापनांवरही गुन्हे दाखल करावेत. मास्कचा उपयोग न करणारर्‍या नागरिकांवर 500 रूपयांची दंडात्मक कारवाई करावी, पाचपेक्षा अधिक बाधित रुग्ण आढळणार्‍या इमारती प्रतिबंधित (सील) कराव्यात, यासह विविध सक्त सूचना महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी केल्या आहेत. 

आयुक्तांनी दिलेल्या सूचना 

1) लक्षणे आढळत नसलेल्या (असिम्प्टोमॅटिक) कोरोनाबाधित रुग्णांना घरी विलगीकरण (होम क्वारंटाईन) करण्यात येते. अशा रुग्णांवर पूर्वीप्रमाणे हातावर शिक्के मारण्यात यावेत. तसेच त्यांची माहिती संबंधित सोसायटींना कळवावी. नागरी आरोग्य केंद्राच्या माध्यमातून त्यांच्यावर बारकाईने नजर ठेवावी. बाधित व्यक्तिंची योग्य माहिती ठेवून त्यांच्या नजीकच्या संपर्कातील व्यक्तिंचे विलगीकरण करावे. असिम्प्टोमॅटिक रुग्णाचा घरातील विलगीकरण (होम क्वारंटाईन) कालावधी पूर्ण होण्याआधी रुग्ण घराबाहेर पडला, सार्वजनिक ठिकाणी फिरला तर त्याची माहिती सोसायट्यांनी महानगरपालिकेच्या नागरी आरोग्य केंद्राला कळवावी. अशा रुग्णांवर प्रभाग अधिकारी यांनी गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही करावी. तसेच अशा रुग्णांना सक्तीने संस्थात्मक विलगीकरण (इन्स्टट्यिूशनल क्वारंटाईन) करावे.
2) ज्या रहिवासी इमारतींमध्ये पाचपेक्षा अधिक रुग्ण आढळतील, अशा निवासी इमारती प्रतिबंधित (सील) करण्यात येतील.
3) लग्न समारंभाची मंगल कार्यालये, जिमखाना/क्लब्ज, नाईट क्लब्ज, उपहारगृहं, चित्रपटगृहं, सर्वधर्मिय स्थळं, खेळाची मैदाने व उद्याने, सार्वजनिक ठिकाणे, शॉपिंग मॉल, तसेच सर्व खासगी कार्यालये अशा सर्व ठिकाणी मास्कचा वापर बंधनकारक आहे. मास्कचा वापर होत नसल्याचे आढळल्यास आणि 50 पेक्षा अधिक व्यक्ती एकावेळी आढळल्यास संबंधित व्यक्तिंना दंड करण्यासोबत त्या-त्या ठिकाणच्या आस्थापनांवर, व्यवस्थापनांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत.
4) लग्नसोहळ्यांचे आयोजन होणारे सभागृह, मंगल कार्यालये येथे नियमितपणे तपासणी करावी. दररोज अशाप्रकारच्या जागांवर तपासणी करावी. तिथे कोणत्याही नियमांचे उल्लंघन झालेले असेल तर दंडात्मक कारवाई करुन लग्नाचे आयोजक/पालक तसेच संबंधित व्यवस्थापनांवर देखील गुन्हे दाखल करावेत.
5) मास्कचा योग्यरित्या उपयोग न करणार्‍या तसेच सार्वजनिक जागी थुंकणार्‍या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी सध्या कार्यरत असलेल्या कर्मचार्यांनी संख्या वाढवून विना मास्क फिरणार्‍यांवर जरब बसवणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने सध्या होत असलेली कारवाईची संख्या वाढवावी.
6) विनामास्क फिरणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांनाही अधिकार देण्यात आलेले असून पोलीसदेखील मार्शल म्हणून नागरिकांना दंड आकारुन कारवाई करु शकतील.
7) खेळाच्या मैदानांवर व उद्यानांमध्ये देखील विना मास्क आढळणार्‍यांवर कारवाई करण्यात येईल.
8) चाचण्यांची संख्या वाढवावी, टेस्टींग, ट्रेसिंग आणि ट्रिटमेंट या तीन टिवर भर दिला जावा. 
9) फिरत्या दवाखान्यांच्या (मोबाईल व्हॅन) माध्यमातून रुग्ण शोध मोहीम सुरु ठेवावी आणि चाचण्या कराव्यात.
10) प्रत्येक विभाग कार्यालयाच्या हद्दीमध्ये हाय रिस्क कॉन्टॅक्ट व्यक्तिंसाठी आणि लक्षणे नसलेल्या बाधितांसाठी कोरोना काळजी केंद्र (नागरी आरोग्य केंद्र व फिरते पथक) पुर्ण क्षमतेने कार्यान्वित ठेवावे.
11) सर्व कोविड उपचार केंद्रांमधील क्षमतांचा आढावा घेऊन नियमित रुग्णशय्या, ऑक्सिजन रुग्णशय्या यांची पुरेशी उपलब्धता ठेवावी, असेही आयुक्तांनी नमूद केले.
12) पनवेल महापालिका क्षेत्रातील सर्व शासकीय तसेच खासगी रुग्णालयांतून कोविड रुग्ण, रुग्णशय्या व इतर आवश्यक माहिती सातत्याने संकलित करुन ती माहिती डॅशबोर्डच्या माध्यमातून आपत्कालीन व्यवस्थापन खात्याने अद्ययावत करावी.

रिपोर्टर

  • Adarsh Swarajya
    Adarsh Swarajya

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Adarsh Swarajya

संबंधित पोस्ट