Breaking News
पनवेल ः लॅपटॉपसह मोबाइल चोरी करणार्या दोन जणांना गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलने गजाआड केले असून, त्यांच्याकडून गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या दोघांच्या अटकेमुळे तळोजा पोलीस ठाणे व नेरूळ पोलीस ठाण्यातील दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.
अभिषेककुमार सिंग यांच्या चौथ्या माळ्यावरील राहत्या घराच्या टॉयलेट पाइपद्वारे खिडकीच्या स्लायडिंग उघडून त्यावाटे प्रवेश करून लॅपटॉप व दोन मोबाइल चोरीस गेल्याची तक्रार तळोजा पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. या अनुषंगाने पोलीस शिपाई प्रवीण भोपी व संजय पाटील तपास करीत असताना कळंबोली परिसरात जीगर मनोज चंदाराणा (22) याच्यावर संशय आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे त्याचा साथीदार मोहम्मद सागर हुसेन यालाही ताब्यात घेऊन अधिक चौकशीत त्यांनी तळोजा तसेच नेरूळ परिसरात लॅपटॉप व मोबाइलची चोरी केल्याची कबुली दिली आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त गुन्हे शेखर पाटील, पोलीस उपायुक्त प्रवीण कुमार व सहा. पोलीस आयुक्त विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे, सहा. पोलीस निरीक्षक गणेश कराड, संदीप गायकवाड, शरद ढोले, पोलीस उपनिरीक्षक वैभव रोंगे, स. फौ. सुदाम पाटील, पोलीस हवालदार अनिल पाटील, सुनील साळुंखे, मधुकर गडगे, सचिन पवार, प्रमोद पाटील, तुकाराम सूर्यवंशी, रणजित पाटील, राजेश बैकर, सचिन पाटील, पो. ना. दीपक डोंगरे, सुनील कुदळे, रूपेश पाटील, सचिन म्हात्रे, राहुल पवार, प्रफुल्ल मोरे, इंद्रजित कानू, पोलीस शिपाई संजय पाटील, प्रवीण भोपी आदींच्या पथकाने केली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya