Breaking News
गुन्हे शाखा कक्ष 3 ने केला 3 लाख 15 हजाराचा मुद्देमाल हस्तगत
पनवेल ः खारघरसह, कामोठे, रबाळे आदी भागात चेन स्नॅचिंग करून मोटार सायकलवरुन पसार होणार्या दोघा जणांपैकी एकाला गुन्हे शाखा कक्ष 3 च्या पथकाने गजाआड केले असून गुन्ह्यातील मोटार सायकल असा मिळून जवळपास 3 लख 15 हजार किंमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. त्यांच्या अटकेमुळे पनवेल व नवी मुंबईतील अजून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
नवी मुंबई आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये गेल्या काही महिन्यात ठिकठिकाणी मंगळसूत्र, सोनसाखळी, जबरी चोरी सारखे गुन्हे घडले होते. या संदर्भात नवी मुंबईचे पोलीस आयुक्त यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखा कक्ष 3 चे वपोनि विजय कादबाने, सपोनि सागर पवार, सपोनि श्रीकांत शेडगे, सपोनि इर्शान खरोटे, पोलीस उपनिरीक्षक विक्रांत थारकर, पोलीस अंमलदार शरद भरगुडे, शेखर वक्टे, मनोज चौधरी, प्रकाश मोरे, विनायक निकम, प्रवीण बाबा, गौतम कांबळे, कृष्णा मोरे, विनोद भोईर, किशोर बोरसे, सुधीर चव्हाण, उमेश नेवारे, संदीप वाघमोडे, सुधीर पाटील, महेंद्र पाटील, चेतन जेजुरकर, संजय फुलकर, दिनेश जोशी, राजेश मोरे, विकास म्हसकर, सचिन सुभे, तुकाराम सोनवलकर आदींच्या पथकाने या सराईत दोन आरोपींचा नवी मुंबई, पनवेल, खारघर, रबाळे आदी ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास, अभिलेखावरील आरोपी तसेच गोपनिय बातमीदारामार्फत माहिती घेवून सखोल तपास करीत असताना सदर आरोपी सरफराज अल्लीउद्दीन शेख (38 रा.खारघर) हा उदयपूर (राजस्थान) येथे लपल्याची माहिती मिळाली. त्यानुसार विशेष पथकाने सदर ठिकाणी सलग 20 तास पाळत ठेवून त्याला ताब्यात घेतले. तर या गुन्ह्यातील दुसरा आरोपी फरार झाला आहे. त्याच्याकडून आतापर्यंत मोठ्या प्रमाणात 62 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या दोन पल्सर मोटार सायकल जप्त करण्यात आल्या आहेत. त्याच्या साथीदाराचा शोध सुरू असून त्यालाही लवकरच गजाआड करण्याचा विश्वास पोलिसांनी वर्तविला आहे.आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya