Breaking News
1 कोटी 21 लाख किमंतीची 20 वाहने जप्त
नवी मुंबई ः भाडेतत्वावर वाहने घेवून ती परस्पर विक्रि करणार्या आंतरराज्यीय टोळीचा पदार्फाश करण्यात नवी मुंबई मध्यवर्ती गुन्हे शाखेला यश आले आहे. या टोळीकडून सुमारे 2 कोटी 2 लाख किमंतीची 20 वाहने जप्त करण्यात आली आहेत.
सदर घटनेत पाच आरोपींना अटक करण्यात आली असून सत्यप्रकाश मिठाईलाल वर्मा उर्फ बाबू(30) रा. विरार, आशिष गंगाराम पुजारी ( 32) रा. पालघर, (मुख्यसुत्रधार) अयान उर्फ राहुल उर्फ अँन्थोनी पॉल (38) रा, मरोळ नाका मुंबई, मोहम्मद वसील मोहम्मद फरीद शेख (33), रा. सुरत, जावेद अब्दुलसत्तार शेख उर्फ मामा (46) रा.दमन अशी त्यांची नावे आहेत. सदर आरोपी हे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने ट्रॅव्हल्स कंपनीचे ऑफीस सुरु करुन तेथे अनुभवी स्टाफ ठेवत असत. गाड्या भाड्याने देणार्या लोकांची ऑनलाईन वेबसाईटवरुन माहिती घेऊन त्यांना फोन करुन गाडी भाड्याने देण्याबाबत सांगत. त्यांचा विश्वास संपादन करुन त्यांच्याकडून गाडीची मुळ कागदपत्रे व वाहन ताब्यात घेऊन ठराविक भाडे सुरु करत. त्यानंतर त्या गाड्या गुजरातमध्ये आपल्या साथीदारांमार्फत विक्रि करत होते. विक्रि केलेल्या रकमेमधुन मुळ मालकाला दोन-तीन महिने भाडे देत होते. जास्तीत जास्त वाहने जमा झाल्यावर ही टोळी कार्यालय व मोबाईल बंद करुन पलायन करत असे. नेरुळ येथे ट्रॅव्हल्स पाँईट कंपनीच्या नावाने कार्यालय सुरु करुन भाडेतत्वावर मुळ कागदपत्रासह वाहने घेऊन ती परस्पर विक्रि केली होती. याप्रकरणी फसवणुक झालेल्यांच्या तक्रारीनुसार नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंह, अपर पोलीस आयुक्त डॉ.बी.जी. शेखर पाटील यांनी मध्यवर्ती गुन्हे शाखा नवी मुंबई यांना सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त प्रविणकुमार पाटील, सहा पोलीस आयुक्त विनोद चव्हाण, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे तपास सुरु करण्यात आला. सदर गुन्ह्यातील आरोपी हे सराईत असल्याने ते सतत जागा बदलून व मोबाईल क्रमांक बदलुन लपुन राहत होते. त्यामुळे गुन्हा उघडकीस आणण्याचे पोलीसांपुढे मोठे आव्हान होते. तपासात पोलीसांना आरोपी सत्यप्रकाश वर्मा उर्फ बाबू हा भोईसर परिसरात असल्याची माहिती मिळाली. तेथे जावून पोलीसांनी घराची पाहणी केली असता तेथे त्याची पत्नी राहत होती. त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलीसांनी त्याच इमारतीमध्ये एक रुम भाड्याने घेउन त्याच्यावर पाळत ठेवली होती. तो घरी येताच पोलीसांनी त्याला ताब्यात गेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबूल दिली. तपासात त्याचे साथीदार आशिष पुजारी व अॅन्थोंनी पॉल हे बँगलोर येथे असल्याची माहिती मिळाल्यावर पोलीस पथक तिकडे रावान झाले. आरोपींचा शोध घेत असता ते एका हॉटेलमध्ये राहत अलग्याची माहिती मिळाली. तेथे पाळत ठेवून पोलीसांनी त्यांना ताब्यात घेतले.
या टोळीने संगनमातने नेरुळ, मरोळ-अंधेरी, येरवडा, पुणे येथील वाहन मालकांची फसवणुक केली आहे. त्यांच्याकडून परस्पर विक्रि केलेल्या स्पॉर्पिओ, इन्वोहा,-क्रिस्टा,व्हेन्टे, झायलो, एर्सेट, इस्टिगो, होंडा बीआरव्ही, वॅगनर, डिझायर, सेलेरिओ इत्यादी सुमारे 1 कोटी 21 लाख रुपये किंतीचे 20 वाहने हस्तगत करण्यात आली आहेत. नेरुळ पोलीस ठाणे या गुन्ह्यातील 16 वाहनांपैकी सुमारे 81 लाख रुपये किमंतीची 9 वाहने गुजरात राज्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाणे व जिल्हाधिकारी कार्यालय यांनी दारु तस्करीमध्ये जप्त केले असल्याचा शोध घेतला आहे. नमुद गुन्ह्याच्या तपासामध्ये आतापर्यंत 2 कोटी 2 लाख रुपये किंमतीची वाहने हस्तगत करण्यात आली आहेत.
सदरची उल्लेखनीय कामगिरी मध्यवर्ती गुन्हे कक्ष, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरक्षिक एन.बी. कोल्हटकर, सहा. पोलीस निरिक्षक राजेश गज्जल, ज्ञानेश्वर भेदोडकर, निलेश तांबे, पोलीस अमंलदार संजय पवार, उर्मिला बोराडे, लक्ष्मण कोपरकर, राहुल वाघ, विजय खरटमोल, किरण राऊत, मिथुन भोसले, नितीन जगताप, प्रकाश साळुंखे, मेघनाथ पाटील, विष्णु पवार, पोपट पावरा, आतिश कदम, सतिश सरफरे, सचिन टिके, सतिश चव्हाण व रुपेश कोळी अशा पथकाने केलेली असून पुढील तपास सहा पोलीस निरिक्षक राजेश गज्जल करत आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya