मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

परदेशात नोकरीचे आमिष; आठ लाखांचा गंडा

नवी मुंबई ः कॅनडामध्ये सुपरवायझरपदाची नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका टोळीने सानपाडा भागात रहाणार्‍या व्यक्तीला तब्बल सात लाख 91 हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सानपाडा पोलिसांनी या टोळीविरोधात फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. 

सानपाडा सेक्टर 10मध्ये कुटुंबासह राहणारा तक्रारदार कृष्णराव शिंदे (44) याने सप्टेंबर महिन्यामध्ये वेगवेगळ्या वेबसाइटवर नोकरीसाठी अर्ज केले होते. काही दिवसांतच अज्ञात टोळीने कृष्णराव याला नोकरीसाठी ईमेल पाठवून दिला. कृष्णराव याने ईमेलला प्रतिसाद दिल्यानंतर या टोळीतील निकोलस नावाच्या व्यक्तीने कॅनडा देशातील ग्रीन गार्डन लाइव्ह फार्म हाऊस कंपनीचा मॅनेजर असल्याचे सांगून त्याच्याशी संपर्क साधला. तसेच, त्याला सुपरवायझरपदाच्या नोकरीसाठी निवडण्यात येत असल्याचे सांगून त्याच्याकडून शैक्षणिक कागदपत्रे व त्याची सर्व माहिती मागून घेतली. त्यानुसार कृष्णराव याने स्वत:ची सर्व माहिती ईमेलवरून पाठवून दिल्यानंतर तीन दिवसांतच त्याला ईमेलद्वारे ऑफर लेटर पाठविण्यात आले. तसेच, त्याला व्हिजासाठी 25 हजार रुपये भरण्यास सांगण्यात आले. जर संपूर्ण कुटुंबाला कॅनडा देशात जायचे असल्यास त्याला व्हिजासाठी एक लाख रुपये भरावे लागतील, असे सांगून भारतीय एजंट अमिना बोमन ईरानी हिच्याशी संपर्क साधण्यास सांगण्यात आले. त्यानुसार कृष्णकुमारने अमिनाशी संपर्क साधून तिला सर्व शैक्षणिक कागदपत्रे व पासपोर्ट पाठवून दिल्यानंतर एजंट अमिता हिने बँकखात्याची माहिती पाठवून देऊन त्यावर एक लाख रुपये पाठविण्यास सांगितले. त्यानुसार कृष्णकुमारने एक लाख रुपयांची रक्कम पाठवून दिली.

त्यानंतर एजंट अमिना हिने कुटुंबाच्या वैद्यकीय विम्यासाठी, वर्क परमिट बनविण्यासाठी, टॅक्ससाठी अशी वेगवेगळी कारणे सांगून कृष्णकुमार याला वेगवेगळ्या बँक खात्यात रोख रक्कम पाठविण्यास सांगितले. त्यानुसार कृष्णकुमार एनएफटीद्वारे व आरटीजीएसद्वारे पैस पाठवित राहिला. अशा पद्धतीने टोळीने कृष्णकुमार याच्याकडून महिनाभरातच तब्बल सात लाख 91 हजारांची रक्कम उकळली. मात्र त्यानंतरही टोळीने आणखी तीन लाख 50 हजार रुपये पाठविण्यास सांगितले. अखेर संशय आल्यानंतर त्याने पैसे पाठविणे बंद केले. त्यानंतर त्याने सानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

रिपोर्टर

  • Adarsh Swarajya
    Adarsh Swarajya

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Adarsh Swarajya

संबंधित पोस्ट