Breaking News
पत्नीला नको त्या अवस्थेत पाहिले आणि.... संतापलेल्या पतीने सिमेंटच्या ब्लॉकने ठेचून पत्नीसह तिच्या प्रियकराची हत्या
पिंपरी - पिंपरी चिंचवडमधील तळवडे या आयटी पार्क परिसरात बुधवारी दोन जणांचे मृतदेह आढळून आले. या दहेरी हत्याकांडामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसही कामाला लागले आणि आपला तपास सुरू केला. या प्रकरणात आता पोलिसांना एक मोठे यश आले असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
दत्तात्रय साबळे हा ठेकेदार असून या दुहेरी हत्या प्रकरणात पोलिसांनी त्याला अटक केली आहे. दत्तात्रय साबळे हा बांधकामांचे ठेके घेतो. तो आपल्या पत्नीसोबत पिंपरी चिंचवडमधील देहू रोड येथे वास्तव्यास होता. दत्तात्रय याच्या पत्नीचे जगन्नाथ सरोदे नावाच्या इसमासोबत प्रेमसंबंध होते. या दोघांच्या प्रेमसंबंधाबाबत दत्तात्रय साबळे याला माहिती मिळाली होती.
घटनेच्या दिवशी दत्तात्रय हा रात्रीच्या सुमारास आपल्या घरी पोहोचला तेव्हा त्याची पत्नी आणि जगन्नाथ हे एकत्र घरात होते. दोघांना एकत्र पाहून दत्तात्रय याच्या रागाचा पारा चढला. संतापलेल्या दत्तात्रय याने रागाच्या भरात आपली पत्नी आणि जगन्नाथ सरोदे या दोघांचीही हत्या केली.
जगन्नाथ सरोदे हा मजुरीचे काम करतो तर दत्तात्रय हा ठेकेदार आहे. दत्तात्रय याने जगन्नाथ आणि पत्नी यांना रात्रीच्या सुमारास घरात एकत्र पाहिले. यानंतर दत्तात्रय याने सिमेंटच्या ब्लॉकने ठेचून पत्नीसह तिच्या प्रियकराची हत्या केली. या घटनेनंतर दत्तात्रय फरार झाला होता. देहूरोड पोलिसांनी आपला तपास करुन आरोपी दत्तात्रय याला बेड्या ठोकल्या आहेत. या संदर्भात 'साम'ने वृत्त दिलं आहे.
दत्तात्रय साबळे ज्या परिसरात राहत होता त्याच परिसरात जगन्नाथ सरोदे हा सुद्धा राहत होता. घटनेच्या दिवशी रात्रीच्या सुमारास जगन्नाथ हा दत्तात्रयच्या घरी पोहोचला. यानंतर रात्री उशिरा दत्तात्रय जेव्हा घरी आला तेव्हा त्याने त्यांना एकत्र पाहिल्यानंतर चांगलाच संतापला आणि मग त्याने दोघांनाही संपवलं. आरोपी दत्तात्रय साबळे याला पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे