NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

खान मुंबईचा महापौर झाला तरी शहराचा विकास करेल

खान मुंबईचा महापौर झाला तरी शहराचा विकास करेल

मुंबई  – मुंबई शहर सर्व जाती धर्मियांचे असुन या शहराच्या महापौरपदी पारशी, बोहरी, खोजा, मेमन, पटेल, आगरी, कोळी, मुस्लीम महापौर राहिलेले आहेत. उद्या कोणी खान महापौर झाला तरी तो शहराच्या विकासात योगदान देईल. खानसुद्धा मतदारांनी निवडलेला नगरसेवक असेल, असा दावा समाजवादी पक्षाचे भिवंडी पुर्वचे आमदार रईस शेख यांनी बुधवारी नियम २९३ च्या प्रस्तावावर विधानसभेत बोलताना केला.

मुंबई शहरावर कोणा एकाची मालकी नाही. या शहराच्या विकासात सर्व जाती धर्मियांचे योगदान आहे. १९३१ पासून मुंबईच्या महापौरांची नावे पाहिली तर जे. बी. बोमन, एच. एम. रहिमतुल्ला, वाय. जे. मेहरअली, एस. पी. सबावाला, ई. ए. बंदुकवाला. ए. यु. मेमन. स. का. पाटील अशी दिसतात. मुंबईचा रंग बदलण्याचा आरोप चुकीचा आहे, असा दावा आमदार रईस शेख यांनी केला.

भिवंडी शहराच्या वाहतुक कोंडीचा प्रश्न यावेळी शेख यांनी उपस्थित केला. राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर करायला सरकार निघाले आहे. भिवंडीला ‘लॉजिस्टीक हब’ करणार आहे. पण, इथली वाहतुक समस्या केव्हा सोडवणार. भिवंडीच्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लागत नाही, परिणामी अनधिकृत बांधकांम होत असून धोकादायक इमारतींचे प्रमाण वाढले असल्याचे शेख म्हणाले.

भाजप आमदार अमीत साटम यांनी या प्रस्तावामध्ये मुंबईचा रंग बदलण्याचे षडयंत्र असून उद्या कोणी खान मुंबईचा महापौर होईल, असे वक्तव्य केले होते. त्याला आमदार रईस शेख यांनी आज प्रत्युत्तर दिले.


रिपोर्टर

  • Mukesh S. Dhawade
    Mukesh S. Dhawade

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Mukesh S. Dhawade

संबंधित पोस्ट