NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

भिवंडीला लॉजिस्टिक हबसाठी समिती, आ. रईस शेख यांचा समावेश

भिवंडीला लॉजिस्टिक हबसाठी समिती, आ. रईस शेख यांचा समावेश

मुंबई  - भिवंडी मध्ये आशिया खंडातील सगळ्यात मोठा लॉजिस्टिक हब बनविण्यासाठी सरकार एक समिती गठीत करेल आणि त्यात उद्योग, नगर विकास विभागाच्या अधिकाऱ्यांसह भिवंडी पूर्वेचे आमदार रईस शेख यांचा समावेश असेल अशी घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत केली.

आमदार रईस शेख यांनी विधानसभेत चर्चेदरम्यान भिवंडीला लॉजिस्टिक हब विकसित करण्याकडे सरकारचे लक्ष वेधले. भिवंडी परिसर अधिसूचित क्षेत्रासाठी आयएएस ऑफिसर नेमण्याची गरज आहे. ६० गावे आणि भिवंडी शहर मिळून १४४ स्केवर किलोमिटर क्षेत्र आहे जे मुंबईच्या ३० टक्के आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांचे सगळे अधिकार प्राधिकरणाकडे आहेत. ३००० कोटीच्या सरकारी जमिनीवर अतिक्रमण होत आहे ते वाचविण्याची गरज आहे. जर सरकार या विषयावर गंभीर झाले राज्य सरकारच्या १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा भिवंडीचा असेल, असे आमदार रईस शेख यांनी विधानसभेत सांगितले.

त्यावर उत्तर देताना, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आशिया खंडातला सगळ्यात मोठा लॉजिस्टिक हब भिवंडीत होऊ शकतो. परंतु तांत्रिक अडचणी जशा की आयएएस ऑफिसर नेमणे, एमएमआरडीएचे अधिकार परत घेणे याच्याशी सरकार सहमत आहे. म्हणून आमदार रईस शेख यांच्या विनंतीला मान देवून आपण एक कमिटी त्यात उद्योग, नगर विकास, यांच्यासह आपण चार पाच जणांची कमिटी गठित करू आणि त्याच धोरण निश्चित करून पुढे जाऊ, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले.

तत्पूर्वी बोलताना आमदार रईस शेख यांनी भिवंडीमध्ये इमारत पडून त्यात पाच वर्षीय बालकाचा मृत्यू तसेच तेथील अधिकाऱ्यांसंदर्भात अनधिकृत बांधकामाच्या अनुषंगाने प्रश्न उपस्थित केला. तेथील अधिकाऱ्याची चौकशी करून कडक कारवाई केली पाहिजे, अशी आग्रही मागणी केली.

त्यावर बोलताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या प्रकरणात आपण उच्चस्तरीय समिती नेमून त्याची चौकशी केली जाईल आणि त्यात दोषी आढळल्यास नक्की कारवाई केली जाईल, असे सांगीतले.


रिपोर्टर

संबंधित पोस्ट