NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

पाकीस्तान झाला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा अध्यक्ष

पाकीस्तान झाला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा अध्यक्ष

पाकिस्तानने 1 जुलै 2025 रोजी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे (UNSC) जुलै महिन्यासाठीचे अध्यक्षपद स्वीकारले आहे. कायदा पालन, शांतता आणि बहुपक्षीय सहकार्याला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हे अध्यक्षपद स्वीकारत असल्याचे पाकिस्तानने जाहीर केले. दहशतवाद्यांचा गड असलेल्या पाकिस्तानलाच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद मिळाल्याने या निर्णयवर प्रश्न उफस्थित केले जात आहे.

हे अध्यक्षपद जानेवारी 2025 पासून सुरू झालेल्या दोन वर्षांच्या अस्थायी सदस्यत्वाचा (Non-Permanent Member) हा भाग आहे. 193 पैकी 182 मतांनी पाकिस्तानची UNSC च्या अस्थायी सदस्यपदी निवड झाली होती, आणि आता वर्णक्रमानुसार फिरणाऱ्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्याकडे आली आहे.

पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने सांगितले, “आम्ही हे अध्यक्षपद गंभीर उद्देश, नम्रता आणि दृढनिश्चयाने स्वीकारत आहोत. संयुक्त राष्ट्र चार्टरच्या तत्त्वांवर, आंतरराष्ट्रीय कायद्याच्या आदरावर आणि बहुपक्षीय सहकार्यावर आमचा दृष्टिकोन आधारित आहे.”

UN मधील पाकिस्तानचे राजदूत असिम इफ्तिखार अहमद यांनी सांगितले की, अध्यक्षपद पारदर्शक, सर्वसमावेशक आणि प्रतिसाद देणारे असेल. जटिल भूराजकीय परिस्थिती, वाढते संघर्ष आणि मानवीय संकटांना सामोरे जाण्यासाठी पाकिस्तान सर्व सदस्यांसोबत काम करेल.


दोन उच्चस्तरीय कार्यक्रम

पाकच्या परराष्ट्र कार्यालयाच्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, अध्यक्षपद जुलैमध्ये दोन उच्च-स्तरीय स्वाक्षरी कार्यक्रमांचे (high-level signature events) आयोजन करेल. 22 जुलै रोजी ‘बहुपक्षीयता आणि विवादांचे शांततापूर्ण निराकरण याद्वारे आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षिततेला प्रोत्साहन’ यावर खुली चर्चा; आणि 24 जुलै रोजी ‘संयुक्त राष्ट्र आणि प्रादेशिक व उप-प्रादेशिक संघटनांमधील सहकार्य: इस्लामिक सहकार्य संघटना (Organisation of Islamic Cooperation )’ यावर एक माहिती सत्राचे आयोजन केले जाईल.

या दोन्ही बैठका उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांच्या अध्यक्षतेखाली होतील. याशिवाय, 23 जुलै रोजी पॅलेस्टाईनच्या प्रश्नावर तिमाही खुली चर्चा होईल, ज्याचेही ते अध्यक्षस्थान भूषवतील.

यापूर्वी पाकिस्तान 2012-13, 2003-04, 1993-94, 1983-84, 1976-77, 1968-69 आणि 1952-53 मध्ये UNSC चा अस्थायी सदस्य होता. आता अध्यक्षपदाच्या माध्यमातून पाकिस्तान जागतिक शांतता आणि सुरक्षेला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करेल.


रिपोर्टर

संबंधित पोस्ट