Breaking News
मनातल्या संवेदना शब्दातून कागदावर उमटते ते खरे साहित्य - प्रवीण ना.दवणे
दि.22 जून रोजी विरार येथील यंग स्टार ट्रस्ट आयोजित साहित्य चावडीच्या 8 व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून कोकण मराठी साहित्य परिषद पालघर जिल्हाध्यक्ष प्रवीण ना.दवणे यांनी विचार व्यक्त करुन साहित्य चावडी या उपक्रमांद्वारे विरार वसई भागातील अनेक नवोदित साहित्यिकांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी लोकनेते हितेंद्र ठाकूर,समन्वयक अजीव पाटील,सुरेखा कुरकुरे, साहित्य चावडीचे सदस्य यांचे मोलाचे योगदान असल्याचे दवणे यांनी शेवटी सांगितले.प्रमुख अतिथी म्हणून लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी आपल्या भागातील नवोदित साहित्यिकांना चालना व प्रेरणामिळावी म्हणून येथील साहित्यिक मंडळींच्या पाठीशी उभे असल्याचे सांगून उपस्थित साहित्यिकांना व आयोजकांना शुभेच्छा दिल्या.व्यासपीठावर उदघाटक गझलकारा ज्योती बालीगा राव, समन्वयक अजीव पाटील, साहित्यिका डॉ.पल्लवी बनसोडे,संगीता कुरकूरे, रेडिओ जॉकी जगदीश संसारे,कवी संमेलनाचे अध्यक्ष वर्जेश सोलंकी आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी विक्रम केसरकर यांनी प्रास्ताविकेतून साहित्य चावडी साहित्य उपक्रमाचा सुरवातीपासूनचा आढावा घेतला.उदघाटनाच्या पहिल्या सत्राचे सुत्रसचालन प्रा.कविता पाटील यांनी केले.
दुस्रया सत्रात माधवी पवार हिने अफजलखानाच्या वघाचा पोवाडा, व्यसनमुक्ती आधारित नाटीका, संस्कार आणि जीवनमूल्यावर आधारीत नाटीकाचे विद्यार्थ्यांनी उत्कृष्टपणे सादरीकरण केले.त्यानंतर कवी वर्जेश सोलंकी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कवी संमेलनात 55 कवी, कवयित्रीनी आपल्या काव्यरचना सादर केल्या.सुत्रसंचालन कवयित्री शिल्पा परुळेकर पै, शुभम पाटील यांनी केले तर शेवटी आभार सुलेखा कुरकुरे यांनी मानले.डोंबिवली, मुंबई, वसई,विरार परीसरातील साहित्यिक या कार्यक्रमाला उपस्थित होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे