Breaking News
आता एसटी बससाठी पाहावी लागणार नाही ; एक नवीन मोबाईल ॲप्लिकेशन सुरू
"रस्ता तेथे एसटी आणि एसटी बसचा प्रवास म्हणजे सुरक्षित प्रवास" या ब्रीदवाक्याप्रमाणे आजही अनेक प्रवासी एसटी बसने प्रवास करणं पसंत करतात. अशातच, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसने म्हणजेच आपल्या लाडक्या 'लालपरी'ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्हाला तुमची लालपरी कुठपर्यंत पोहोचली आहे, हे सहजपणे जाणून घेता येणार आहे.
एसटी बसचे लाईव्ह लोकेशन समजून घेण्यासाठी एक नवीन मोबाईल ॲप्लिकेशन सुरू करण्यात येणार आहे. येत्या 15 ऑगस्टपासून हे ॲप प्रवाशांसाठी उपलब्ध होईल. याबाबतची माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
या नवीन सुविधेमुळे प्रवाशांना आपल्या तिकिटावर असलेल्या नंबरच्या माध्यमातून बसची अचूक वेळ आणि सध्याची स्थिती जाणून घेता येईल. त्यामुळे आता प्रवाशांना ज्या बसने जायचं आहे, त्यासाठी जास्त वाट पाळावी लागणार नाही आणि प्रवासात होणारा खोळंबाही टळेल. हा बदल प्रवाशांसाठी निश्चितच सोयीचा ठरणार आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर