Breaking News
RTI कार्यकर्ते अनिल गलगली यांच्या पाठपुराव्यानंतर
वर्ली टॉवर प्रकल्पाच्या खर्चात BMC कडून 37 कोटींची कपात
मुंबई महानगरपालिका (ँश्ण्) ने वर्ली येथील डांबरीकरण प्रकल्प आणि चाचणी प्रयोगशाळेच्या जागेवर उभारण्यात येण्राया 29 मजली व्यावसायिक इमारतीच्या प्रस्तावित प्रकल्पाच्या खर्चात 37 कोटी रुपयांची मोठी कपात केली आहे. ही कारवाई Rऊघ् कार्यकर्ते अनिल गलगली यांनी या प्रकल्पातील रोबोटिक पार्किंग प्रणालीच्या अवास्तव खर्चाबाबत केलेल्या तक्रारीनंतर करण्यात आली.
सुरुवातीला या प्रकल्पाचा खर्च 525 कोटी रुपये एवढा होता, त्यात 450 वाहनांसाठी रोबोटिक पार्किंगसाठी 96 कोटी रुपये खर्ची घालण्यात येणार होते. मात्र, गलगली यांनी ऑगस्ट 2024 मध्ये पालिका आयुक्त आणि मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या खर्चावर आक्षेप नोंदवला होता आणि अन्य शहरांमध्ये याच प्रकारची प्रणाली कमी खर्चात बसवली जात असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. या पाठपुराव्याची दखल घेत महानगरपालिकेने जुन्या निविदेला रद्द करून मे 2025 मध्ये नवीन निविदा प्रसिद्ध केली, ज्यामध्ये एकूण खर्च 488 कोटी रुपये ठरवण्यात आला. अनिल गलगली यांना ँश्ण् कडून पत्र आले असून 19 जून 2025 रोजी अनिल गलगली यांना लेखी पत्र पाठवून सांगितले की, त्यांच्या तक्रारीनंतर जुनी निविदा रद्द करण्यात आली असून पुनर्नियुक्त तांत्रिक सल्लागार आणि कार्यकारी अभियंता (वाहतूक नियंत्रण) यांच्या सल्ल्याने रोबोटिक पार्किंगची नवीन अंदाजित किंमत 72 कोटी रुपये निश्चित करण्यात आली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar