Breaking News
भायखळा येथे लहानग्यांसाठी खेळाचे साहित्य वाटप.
मुंबई - शिवसेना खासदार अरविंद सावंत आणि आमदार मनोज जामसुतकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज खासदार निधीतून भायखळा विधानसभा मतदार संघातील शाखा क्रमांक २०७ मधील लक्ष्मी रेसिडेंसी येथे लहान मुलांच्या खेळांचे साहित्य बसविण्यात आले असून याचा लोकार्पण सोहळा पार पडला.
लहान मुलांना खेळण्यासाठी एक विरंगुळ्याचे ठिकाण म्हणून आजपासून ही जागा खुली करून देण्यात आलेली आहे. एकीकडे मोबाईलच्या स्क्रीनवर अडकलेल्या मुलांना मैदानी खेळाकडे वळवण्यासाठी हे खेळाचे साहित्य महत्वपूर्ण भूमिका बजावेल आणि त्यांना शारीरिक खेळ खेळण्यास प्राधान्य मिळेल अशी माहिती आमदार मनोज जमशेदकर यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी उपस्थित बालकांच्या चेहऱ्यावरील आनंद खूप काही सांगून जात होता. यावेळी सोबत पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, स्थानिक नागरिक आणि बच्चे कंपनी मोठ्या संख्याने उपस्थित होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar