Breaking News
मुख्यमंत्र्यांनी पालघरमध्ये केले विद्यार्थ्यांचे स्वागत….
पालघर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जिल्हा परिषद, केंद्रीय प्राथमिक शाळा दुर्वेस, पालघर येथे ‘शाळा प्रवेशोत्सव 2025-26’ कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांचे स्वागत केले आणि वृक्षारोपण देखील केले. यामाध्यमातून त्यांनी पर्यावरणाची कास धरत हरित महाराष्ट्राच्या निर्मितीचा संदेश दिला.
नव्या शैक्षणिक वर्षात
मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा दुर्वेस, पालघर येथे विद्यार्थ्यांचे स्वागत गुलाबाचे फूल देत केले. यावेळी ‘शाळा प्रवेशोत्सव 2025-26’ कार्यक्रमादरम्यान त्यांनी विद्यार्थ्यांना गणवेश आणि पाठ्यपुस्तकांचे वितरण देखील केले आणि त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला.
शाळेच्या पाहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून झालेल्या या स्वागताने भारावून गेलेल्या विद्यार्थ्यांनी देखील यावेळी संवादात मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. याप्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर