Breaking News
आता Apple बनवणार स्मार्ट चष्मे
Bloomberg आणि TechTimes च्या अहवालानुसार, Apple २०२६ च्या अखेरीस आपले पहिले AI-सक्षम स्मार्ट चष्मे बाजारात आणण्याची योजना आखत आहे. हे ग्लासेस Meta च्या Ray-Ban AI चष्म्यांना टक्कर देतील, पण Apple चा भर असेल सिरी, iPhone इंटिग्रेशन आणि प्रीमियम डिझाइनवर आहे. Apple यासाठी Apple Watch सारख्या कमी ऊर्जा वापरणाऱ्या चिप्सवर आधारित खास प्रोसेसर तयार करत आहे. यामुळे ग्लासेस हलक्या, कार्यक्षम आणि दीर्घकालीन वापरासाठी योग्य असतील. २०२५ अखेरीस प्रोटोटाइप तयार होतील. २०२६ अखेरीस ग्राहकांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. किंमत अद्याप जाहीर नाही, पण Vision Pro ($3,499) पेक्षा स्वस्त असण्याची शक्यता आहे.
काय असेल विशेष ?
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant