Breaking News
तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकरांची कहाणी उलगडणार मोठ्या पडद्यावर
मुंबई - तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित कहाणी मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी ही जबाबदारी घेतली आहे. TV9 च्या रिपोर्टनुसार, या चित्रपटात श्रद्धा कपूर विठाबाईंची भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. अद्याप निर्मात्यांकडून याबाबत अधिकृत घोषणा झाली नसली, तरी लक्ष्मण उतेकर सध्या या सिनेमाच्या प्राथमिक तयारीत व्यस्त असल्याची माहिती आहे. श्रद्धा कपूर विठाबाईंच्या भूमिकेत कशी दिसणार हे पाहणं रंजक ठरणार आहे. या सिनेमाची अधिकृत घोषणा लवकरच होईल अशी अपेक्षा आहे.
विठाबाई नारायणगावकर या महाराष्ट्रातील अग्रगण्य लावणी कलावंत होत्या. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर तमाशा या लोककलेचा प्रचार-प्रसार केला. विठाबाईंच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र खूप संघर्ष होता. या सिनेमाची कथा ‘तमाशा: विठाबाईच्या आयुष्याचा’ या पुस्तकावर आधारित असल्याची शक्यता आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade