Breaking News
पावसात अडकलेल्या नागरिकांना माजी उपमहापौर बाबूभाई भवानजी यांनी केली मदत
मुंबई - मुंबईत पडलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवा, तसेच वाहतूक अगदी संथ गतीने सुरू होती. काही नागरिकांना तसेच चाकरमानी नागरिकांना आपल्या घरी जाण्यासाठी धावाधाव करावी लागत होती. अशा दादर येथे पावसात अडकलेल्या नागरिकांना, चाकरमान्यांना, तसेच रेल्वे प्रवाशांना भवानजी यांनी मोफत जेवण आणि छत्री वाटप करून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. याबाबत नागरिकांनी त्यांचे आभार मानले. आम्ही नेहमी लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करत असतो. या मुसळधार पावसामुळे अनेकांचे जीवन विस्कळीत झाले असून कामधंदे जेवण झाले आहेत त्यामुळे त्यांना हा आम्ही एक छोटासा मदत करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती माजी उपमहापौर भाजपा नेते बाबुभाई भवानजी यांनी दिली. सदर कार्यक्रमास मुंबई भाजपा हॉकर्स युनिटचे प्रमुख विवेक भाटकर, फुलोरा फाउंडेशनचे अध्यक्ष अरून सबनीस, भाजपा हॉकर्स यूनिटचे पदाधिकारी महेश सुर्वे ,संदीप पानसंडे संतोष पायगुडे आणि इतर महिला पदाधिकारी आणि भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर