Breaking News
राज्याच्या किनारपट्टीवर समुद्र खवळलेलाच, सावधानतेचा इशारा
सिंधुदुर्ग - पश्चिम किनाऱ्यावरील अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पूर्वमध्य अरबी समुद्र आणि लगतच्या ईशान्य अरबी समुद्रावर, कोकण-गोवा किनाऱ्यावर आणि त्याच्या बाहेर ४०-५० किमी प्रतितास ते ६० किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहत आहेत. २४ आणि २५ मे रोजी पूर्वमध्य अरबी समुद्र आणि कोकण, गोवा आणि लगतच्या दक्षिण गुजरात किनाऱ्यावर ४५-५५ किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहतील.२३ ते २७ मे दरम्यान गोवा,महाराष्ट्र किनाऱ्यावर समुद्राची स्थिती खवळलेली ते खूप खवळलेली असण्याची शक्यता आहे.
मच्छिमारांना कोकण, गोवा, दक्षिण गुजरात, दमण आणि दीव, दादर आणि नगर हवेली किनारे आणि लक्षद्वीप परिसरात २७ मे २०२५ पर्यंत न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. २५ ते २७ मे २०२५ समुद्र पर्यटन आणि साहसी खेळांना बंदी असेल.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे