Breaking News
नरेंद्र मोदी स्टेडीयम बॉम्बने उडवून देण्याची धमकी
अहमदाबाद - गुजरात क्रिकेट असोसिएशनला पाकिस्तानमधून ईमेलद्वारे धमकी मिळाली आहे, ज्यामध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. या ईमेलमुळे अहमदाबाद पोलिसांनी तातडीने सुरक्षा यंत्रणा सक्रिय केली आणि बॉम्ब निकामी पथकाने स्टेडियमची तपासणी केली. नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये १४ आणि १८ मे रोजी आयपीएलचे सामने होणार आहेत, त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. गुजरात टायटन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांचे सामने येथे खेळवले जाणार आहेत.
नरेंद्र मोदी स्टेडियम हे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आहे. त्याची आसन क्षमता १ लाख ३२ हजार आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर