Breaking News
बोगस IAS पूजा खेडकर 9 महिन्यांनी माध्यमांसमोर
UPSC ची फसवणूक केल्याप्रकरणी पूजा खेडकर हीच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून ती फरार होती. त्यानंतर तिला अटकेपासून संरक्षण मिळाले. त्यानंतर आज ती जवळपास 9 महिन्यांनंतर दिल्ली पोलिसांपुढे चौकशीसाठी हजर झाली. यावेळी माध्यमांना सामोरे जाताना तिने स्वतःचा जोरदार बचाव करण्याचा प्रयत्न केला.
3 वर्षांत माझी सहावेळा तपासणी झाली. एम्स रुग्णालयाच्या पॅनेलने दिलेले प्रमाणपत्र चुकीचे असू शकत नाही. माझे दिव्यांग प्रमाणपत्र खोटे आहे किंवा ओबीसी प्रमाणपत्र खोटे आहे असे यूपीएससीने कुठेही म्हटले नाही, असा दावाही पूजा खेडकरने यावेळी बोलताना केला.
या प्रकरणी तिने नावापुढे आईचे नाव लावणे केव्हापासून गु्न्हा झाला? असा प्रश्न उपस्थित करत आपल्यावरील सर्वच आरोप धुडकावून लावलेत. माध्यमांत माझ्याविषयी चुकीची माहिती गेली आहे. मी नाव बदलले, जास्तीचे अटेम्प्ट दिले, दिव्यांग प्रमाणपत्र खोटे दिले हे सर्वकाही खोटे आहे, असे तिने म्हटले आहे.
पूजा खेडकर पत्रकारांशी बोलताना म्हणाली, मी तपास यंत्रणेला मदत करण्यास तयार आहे. प्रत्येकवेळी मी तसे प्रतिज्ञापत्र कोर्टात सादर केले आहे. सुप्रीम कोर्टातही मी ते दाखल केले होते. त्यानुसार, आज मी माझा जबाब नोंदवणार आहे. त्यानंतर या प्रकरणाची कारवाई पुढे सरकेल. क्राईम ब्रँचलाही मी मेल केला आहे. मी स्टेटमेंट देण्यासाठी तयार आहे, मला चौकशीसाठी फोन करा, असे मी त्यांना सांगितले आहे. माझ्याविषयी मीडियात चुकीची माहिती गेली आहे. मी नाव बदलले, जास्तीचे अटेम्प्ट दिले, दिव्यांग प्रमाणपत्र बोगस दिले, हे सर्वकाही खोटे आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade