Breaking News
पाकिस्तानी विमानांसाठी भारतीय हवाई क्षेत्र बंद
भारताने ३० एप्रिलपासून २३ मेपर्यंत पाकिस्तानी विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे. या हल्ल्यात २६ लोकांचा मृत्यू झाला होता, ज्यामध्ये अनेक पर्यटकांचा समावेश होता. भारताने या निर्णयाद्वारे पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई क्षेत्रात प्रवेश करण्यास मनाई केली आहे. याआधी पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले होते.
या निर्णयामुळे पाकिस्तानच्या विमान वाहतूक उद्योगावर तुलनेने कमी परिणाम होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानसाठी एअरस्पेस बंद केल्याने त्यांचं मोठं आर्थिक नुकसान होईल. पाकिस्तानची विमान आधी भारतीय एअरस्पेसचा वापर करुन चीन, म्यानमार, थायलँड, मलेशिया आणि श्रीलंकेला जायची. पण आता एअरस्पेस बंद केल्याने त्यांना दूरवरच अंतर कापून या देशात जावं लागणार आहे. पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स (PIA) भारतीय हवाई क्षेत्राचा वापर करून कुआलालंपूरपर्यंत उड्डाण करते. पाकिस्तानने भारताच्या या निर्णयावर प्रतिक्रिया देताना भारताचे आरोप फेटाळले आहेत आणि निष्पक्ष तपासाची मागणी केली आहे.
तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने सिंधू नदी पाणी करार निलंबित करणे, अटारी सीमा बंद करणे, पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करणे, आणि राजनयिक संबंध कमी करणे यासारखे अनेक कठोर निर्णय घेतले आहेत
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade