Breaking News
पंजाब बँक बुडवणाऱ्या मेहुल चोक्सीविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी
मुंबई - पंजाब नॅशनल बँकेत कोट्यवधींचा घोटाळा करणारा मेहुल चोक्सी याच्या विरोधात मुंबईतील दंडाधिकारी न्यायालयाने मोठी कारवाई केली आहे. २०२२ मध्ये उघडकीस आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणात न्यायालयाने चोक्सीविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. हिरे व्यापारी मेहुल चोक्सी व त्याचा भाचा नीरव मोदी या दोघांनी १३ हजार ५०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप आहे.
CBI ने चोक्सीशी संबंध असलेल्या बेझेल ज्वेलरी इंडिया आणि गीतांजली जेम्स या कंपन्यांसह सात जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. सीबीआयच्या म्हणण्यानुसार, कॅनरा बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांनी एका कन्सोर्टियम करारांतर्गत बेझेल ज्वेलरीला ३० कोटी रुपये आणि २५ कोटी रुपये कार्यरत भांडवल सुविधा म्हणून मंजूर केली होती.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर