Breaking News
निकोबार बेटावर वेळेआधीच मोसमी पाऊस येणार!
मुंबई :—* देशभरात उन्हाळ्याचा कडाका वाढत असतानाच दक्षिण भारताच्या दिशेने मोसमी पावसाच्या आगमनाची चाहुल लागायला सुरुवात झाली आहे.
हवामान अभ्यासकांच्या प्राथमिक अंदाजानुसार यंदा मोसमी पाऊस वेळेच्या आधीच निकोबार बेटांवर दाखल होण्याची शक्यता आहे.
हवामान अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार, अंदमान आणि निकोबार बेटांजवळील समुद्रसपाटीवर सध्या ढगांच्या हालचाली आणि वाऱ्याचा वेग यामध्ये लक्षणीय बदल दिसून येत आहेत. हे लक्षण वेळे आधी मोसमी पावसाच्या आगमनाची चाहुल देत आहे.
सामान्यतः मोसमी पाऊस मेच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात या भागात दाखल होतो. मात्र यंदा तो एक आठवडा आधी दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
निकोबार बेटांवर मोसमी पाऊस कधी दाखल होतो, यावरून भारतात नैऋत्य मोसमी वाऱ्याची प्रगती, वेग, वेळ, आणि पावसाचा अंदाज बांधला जातो. त्यामुळे येथील बदलांकडे संपूर्ण देशाचे लक्ष असते.
निकोबार बेटांवरील हवामान
ऑक्टोबर-डिसेंबरदरम्यान तुलनेत कमी पाऊस, पण दमट हवामान कायम
सरासरी पर्जन्यमान
भौगोलिक प्रभाव
पावसाच्या नोंदी
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे