Breaking News
१ मे पासून ATM व्यवहारात होणार हे महत्त्वाचे बदल
भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) १ मे २०२५ पासून ATM व्यवहारांसाठी सुधारित फ्रेमवर्क लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकांकडून ग्राहकांना देण्यात येणाऱ्या ATM सेवा जास्त कार्यक्षम आणि पारदर्शक बनवण्यासाठी हे बदल करण्यात आले आहेत. ATM चा वाढता वापर लक्षात घेता, RBI ने मोफत व्यवहारांची मर्यादा खालीलप्रमाणे निश्चित केली आहे. मासिक मोफत व्यवहारांच्या मर्यादेपलीकडे जाऊन केलेल्या प्रत्येक व्यवहारासाठी अधिक शुल्क आकारले जाईल. हे शुल्क आर्थिक (जसे की पैसे काढणे, निधी हस्तांतरण) आणि आर्थिक नसलेल्या (जसे की बॅलन्स तपासणी, मिनी स्टेटमेंट) अशा दोन्ही प्रकारच्या व्यवहारांवर लागू होईल.
हे लक्षात ठेवा
आपल्या मासिक मोफत व्यवहारांची मर्यादा लक्षात ठेवा. अतिरिक्त शुल्क टाळण्यासाठी एटीएम व्यवहार नियोजनबद्ध पद्धतीने करा. डिजिटल बँकिंग सुविधांचा अधिक वापर करा, ज्यामुळे बऱ्याच सेवा शुल्क वाचू शकते. अशा सुचना RBI कडून देण्यात आल्या आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant