Breaking News
कर्करोगावरील उपचारांसाठी केंद्र सरकारकडून ३ हजार कोटींची तरतूद
चंद्रपूर येथील राज्य कर्करोग संस्थेत नवीन तंत्रज्ञानाने सुसज्ज ‘ट्रूबिम’ सुविधा सुरू करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांनी या सुविधेचे उद्घाटन केले. या तंत्रज्ञानाच्या मदतीने किरणोत्सर्ग उपचार अधिक प्रभावीपणे करता येणार आहेत. नड्डा यांनी सांगितले की, कर्करोग उपचार धोरणात्मक पातळीवर प्राधान्य देण्यात आले असून, केंद्र सरकारने त्यासाठी तब्बल ३००० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
देशभरातील १,७५,००० आयुष्मान आरोग्य मंदिरांमध्ये मुख, स्तन आणि गर्भाशयाच्या कर्करोगासाठी तपासणी सुविधा दिली जात आहे. यासाठी ३० वर्षांपासून नियमित स्क्रीनिंग आवश्यक करण्यात आले आहे. या प्रयत्नांमुळे कर्करोगाचे लवकर निदान आणि प्रभावी उपचार करण्यात मदत होईल.”
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे